Asia Cup 2023 Matches Rescheduled: Twitter
Sports

Asia Cup 2023 Matches Rescheduled: आशिया कपबाबत मोठी अपडेट; कोलंबोमधील सर्व सामने दुसऱ्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार? कारण...

Asia Cup 2023 Matches Rescheduled: आशिया कपबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेदरम्यान आशिया क्रिकेट परिषद मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Vishal Gangurde

Asia Cup 2023 Matches Rescheduled:

आशिया कपबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेदरम्यान आशिया क्रिकेट परिषद मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये होणारे सुपर-४ स्टेजचे सामने पल्लेकेल येथे खेळवण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

कोलंबो येथे होणारे सर्व सामने पल्लेकेल मैदानात खेळवण्याची अधिक शक्यता आहे. कोलंबो येथे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस कोलंबोमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे एससी (आशिया क्रिकेट परिषद) कोलंबोमधील सर्व सामने दुसऱ्या स्टेडियमवर खेळवण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ग्रुप स्टेजचे ४ सामने झाले आहेत. या फेरीचे २ सामने व्हायचे बाकी आहेत. वेळापत्रकानुसार, पाकिस्तानमध्ये ४ सामने तर श्रीलंकेमध्ये ९ सामने होण्याची शक्यता आहे. तसेच अंतिम सामन्यासहित सुपर-४ स्टेजचे सर्व सामने कोलंबोमध्येच खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, श्रीलंकेच्या राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सामन्यादरम्यान पावसासहित धुके देखील पडण्याची शक्यता आहे. यामुळे एसीसी सुपर-४ सामने कोलंबोऐवजी पल्लेकल किंवा दांबुला मैदानात खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या पल्लेकेल येथे काल पाऊस बरसला. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात आला.

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या पल्लेकेल येथे काल पाऊस बरसला. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात आला. कालच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

टीम इंडियाची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने २६६ धावा कुटल्या. इशानने ८१ चेंडूत ८२ धावा कुटल्या. तर अष्टपैलू पंड्याने ९० चेंडूत ८७ धावा कुटल्या. या दोघांच्या फलंदाजीनंतर मात्र पाकिस्तानला फलंदाजी करता आली नाही. मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

SCROLL FOR NEXT