Asia Cup 2022 Saam Tv
Sports

Asia Cup|श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतरही टीम इंडियाचा फायनलमध्ये प्रवेश होणार का? जाणून घ्या काय आहे समीकरण

टीम इंडियाच्या नशिबाची चावी अफगाणिस्तानकडे, आज पाकिस्तानशी मुकाबला

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : आशिया चषक (Asia Cup) 2022 च्या सुपर 4 सामन्यात टीम पाकिस्तान बुधवारी 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानशी भिडणार आहे. पाकिस्तानच्या संघाने सुपर फोरमध्ये टीम इंडियाचा (Team India) पाच गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा चार विकेट्स राखून पराभव केला. टीम इंडियासोबतच भारतीय क्रिकेट चाहतेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा सामना पाहणार आहेत. आशिया चषकाच्या सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानपाठोपाठ भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आहे.

अफगाणिस्तानचा संघ टीम इंडियाला (Team India) अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खुला करू शकतो. यासाठी अफगाणिस्तानला शारजाह क्रिकेट स्टेडियमवर टीम पाकिस्तानला हरवावे लागणार आहे. (Asia Cup 2022)

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ टी-२० क्रिकेटमध्ये तीनवेळा आमनेसामने आले आहेत. यात पाकिसातनचे पारडे जड आहे. मात्र, यावेळी पाकिस्तानविरुद्ध रशीद खान आणि मुजीब उर रहमान ही जोडी जोरदार कामगिरी करू शकतात. राशिद खानने टी-20 लीगमध्ये 5 वेळा बाबर आझमला बाद केले आहे.

श्रीलंकेच्या टीमने अफगाणिस्तान आणि भारताचा पराभव करून आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जर पाकिस्तानच्या संघाने आज अफगाणिस्तानला पराभूत केले तर अफगाणिस्तानसोबतच भारतही आशिया कप 2022 मधून बाहेर पडेल. याउलट अफगाणिस्तानच्या विजयाने टीम इंडियाचे अंतिम फेरीचे दरवाजे पुन्हा उघडू शकतात.

टीम इंडियाचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे समीकरण

अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव करायला पाहिजे, यानंतर टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला पाहिजे. श्रीलंकेच्या संघानेही पाकिस्तानचा पराभव केला पाहिजे, भारतीय संघाचा नेट रनरेट अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघांपेक्षा चांगला असावा, तरच टीम इंडियाचा (Team India) अंतिम फेरीत प्रवेश होऊ शकतो.

टीम पाकिस्तानसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन.

टीम अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मोहम्मद नबी (क), रशीद खान, अजमतुल्ला ओमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान आणि फजल फारुकी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jowar Flour Recipe : ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ कधी खाल्लाय का?

Sindhudurg : कणकवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान हाणामारी! | VIDEO

Cough Remedies: सतत खोकल्याचा त्रास होत होतोय? 'या' सवयी लगेच सोडा!

Pune Traffic: १ ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, शहरातील अनेक रस्ते बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

एटीएममध्ये निघाला विषारी नाग; पैसे टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप

SCROLL FOR NEXT