Asia Cup 2022 Srilanka vs Afghanistan Saam TV
Sports

Asia Cup 2022 : पहिल्याच सामन्यात श्रीलंका पराभूत; अफगाणिस्तानची विजयी सुरूवात

पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला

Satish Daud

नवी दिल्ली : आशिया चषक 2022 (Asia Cup) स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने दमदार सुरूवात केली. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात (Cricket) अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पहिल्या २ षटकात ३ गडी गमावल्यानंतर श्रीलंकेचा संघ फक्त १०६ धावांवर गारद झाला. श्रीलंकेनं दिलेलं आव्हान अफगाणिस्तानने केवळ १० षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. (Asia cup 2022 SL vs AFG Live Score)

१०६ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने जोरदार सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांनंतर संघाने बिनबाद ८३ धावा केल्या होत्या. हजरतुल्ला झझाई आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी आक्रमक फलंदाजी केली. गुरबाजने १८ चेंडूत ४० धावा केल्या, हसरंगाने त्याला बाद केले. त्यानंतर इब्राहिम झद्रान 13 चेंडूत 15 धावा करून धावबाद झाला. मात्र तोपर्यंत संघाला आणखी फक्त 3 धावा करायच्या होत्या. संघाने 10.1 षटकांत 2 गडी राखून लक्ष्य गाठले. हजरतुल्ला झाझाई 37 आणि नजीबुल्ला जद्रान 2 धावांवर नाबाद राहिले.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या 12 चेंडूतच श्रीलंका संघाचे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज माघारी परतले. पहिल्याच षटकात अफगाणिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फजल हक फारुकीने श्रीलंकेला सलग दोन चेंडूंत दोन धक्के दिले. (Asia cup 2022 Latest Updates)

फारुकीने पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिसला एलबीडब्ल्यू केलं. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने चारिथ असलंकालाही माघारी पाठवलं. असलंकाला खातेही उघडता आले नाही. यानंतर दुसऱ्याच षटकात श्रीलंकेला तिसरा धक्का बसला.

नवीन-उल-हकने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज पथुम निशांकाला बाद केलं. दरम्यान, अफगाणिस्तानने भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेला १०६ धावांवर रोखलं. श्रीलंकेकडून राजपक्षे याने ३८ तर करुणारत्नेने ३१ धावा केल्या. दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. अफगाणिस्तानकडून फजल हक फारुकीने ३ बळी घेतले. याशिवाय मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांना २-२ बळी मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Coconut Water : उन्हाळ्यात रोज नारळ पाणी प्यायल्याने काय होते? जाणून घ्या फायदे

Pune Accident: नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक; चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

Homemade Hair Mask For Hair Growth: दाट आणि लांब केसांसाठी घरीच बनवा 'हेअर मास्क', एक महिन्यातच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT