Asia Cup 2022 KL Rahul Rohit Sharma Latest Update SAAM TV
क्रीडा

केएल राहुलमध्ये रोहित शर्मापेक्षा अधिक क्षमता, फक्त...; वर्ल्डकप विजेता क्रिकेटपटू काय म्हणाला?

के.एल. राहुलकडे कर्णधार रोहित शर्मापेक्षाही अधिक क्षमता आहे, असं विधान माजी क्रिकेटपटूने केले आहे.

Nandkumar Joshi

Asia Cup 2022 | मुंबई: टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनं के. एल. राहुल याचं कौतुक केलं आहे. त्याचवेळी आपल्या फलंदाजीत सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे.

केएल राहुल (KL Rahul) यानं मोठ्या ब्रेकनंतर गेल्या महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियात (Team India) पुनरागमन केलं होतं. आयपीएल २०२२ नंतर आधी दुखापत आणि नंतर कोरोना संसर्ग झाल्याने तो संघाबाहेर होता.

बराच मोठा काळ क्रिकेटपासून दूर असल्यानं तो सध्या फॉर्मात नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत त्याने फलंदाजी केली. पण काही खास करू शकला नाही. त्यानंतर आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) मध्येही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगविरुद्ध तो खूपच धीम्या गतीने खेळला.

के. एल. राहुल याच्यावर यावर्षी जूनमध्ये एक शस्त्रक्रिया झाली होती. संघात पुनरागमन केल्यानंतर तो चार सामने खेळला आहे. मात्र, महत्वपूर्ण कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला आहे. आशिया कपमध्येही हाँगकाँगविरुद्ध सलामीला खेळताना त्याने ३९ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. त्यामुळे स्थान अनिश्चितता लक्षात घेता त्याने स्वतःला सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अशावेळी त्याच्यावर गौतम गंभीरनं विश्वास दाखवला आहे. राहुलने आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवण्याची तसेच नैसर्गिक खेळ करण्याची आवश्यकता आहे, असे गंभीर म्हणाला.

केएल राहुलमध्ये खूप जबरदस्त क्षमता आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मापेक्षाही अधिक. त्याला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही. ड्रेसिंग रुममध्ये कदाचित रोहित शर्मापेक्षाही त्याच्याकडे अधिक क्षमता आहे. कारण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तशी कामगिरी करून दाखवली आहे, असे गंभीर म्हणाला.

याच वर्षीच्या सुरुवातीला लखनऊ सुपर जायंट्सकडून के. एल राहुल याला मार्गदर्शन करणाऱ्या गौतम गंभीरला त्याच्याकडून खूपच अपेक्षा आहेत. राहुलनं अधिकाधिक वेळ क्रिजवर घालवला तर तो आत्मविश्वास परत मिळवेल. स्पर्धेत सुपर फोर फेरीत तो अधिक आक्रमकपणे फलंदाजी करू शकेल. आगामी सामन्यांतही तो मोकळेपणाने खेळेल, कारण त्याच्यात तितकी क्षमता आहे, असंही गौतम गंभीर म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Beed News : क्षीरसागरांचा ४० वर्षाचा दबदबा मिटवायचाय; आशुतोष मेटेंचे क्षीरसागरावर टीकास्त्र   

Tim Southee: टीम साऊदीचा टेस्ट क्रिकेटला रामराम; WTC आधीच न्यूझीलंडची 'कसोटी' लागणार

SCROLL FOR NEXT