Arshdeep Singh  Twitter
क्रीडा

Arshdeep Singh Wickets Video: नाद करा पण अर्शदीपचा कुठं! सलग २ चेडूंवर स्टंपचे केले २ तुकडे पाहा VIDEO

Arshdeep Singh Wickets: अर्शदीप सिंगचा २ स्टंप तोडण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Arshdeep Singh Bowling: वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये हाय स्कोरिंग सामना पार पडला. १९ व्या षटकापर्यंत असे वाटत होते की, मुंबई इंडियन्स संघ हा सामना जिंकू शकतो.

मात्र शेवटच्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला अन् पूर्ण गेम फिरवला. अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर त्याने पंजाब किंग्ज संघाला १३ धावांनी विजय मिळवून दिला. दरम्यान अर्शदीप सिंगचा २ स्टंप तोडण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अर्शदीपने तोडले लाखो रूपयांचे स्टंप..

मुंबई इंडियन्स संघ या डावात २१५ धावांचा पाठलाग करत होता. १९ व्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने १९९ धावा केल्या होत्या. अंतिम षटकात मुंबईला विजय मिळवण्यासाठी १६ धावांची गरज होती.

पंजाब संघाकडून Arshdeep Singh गोलंदाजी करत होता. तर मुंबई इंडियन्स संघाकडून Tim David आणि Tilak Verma फलंदाजी करत होते. षटकातील पहिल्या चेंडूवर टीम डेव्हिडने एक धाव घेतली. दुसरा चेंडू निर्धाव राहिला.

षटकातील तिसरा चेंडू अर्शदीपने यॉर्कर चेंडू टाकला. ज्यावर तिलक वर्मा क्लीन बोल्ड झाला. चौथा चेंडू देखील अर्शदीपने फुल लेंथ यॉर्कर टाकला, ज्यावर नेहाल वढेरा क्लीन बोल्ड झाला. तर शेवटच्या २ चेंडूंवर त्याने केवळ १ धाव खर्च केली. यासह त्याने आपल्या संघाला १३ धावांनी विजय मिळवून दिला. मुख्य बाब म्हणजे दोन्ही वेळेस क्लीन बोल्ड करताच स्टंपचे २ तुकडे झाले. (Arshdeep Singh Wicket video)

आयपीएलमध्ये LED stump चा वापर केला जातो. या स्टंपची किंमत ३५ ते ४० लाख रुपयांच्या आसपास आहे. अर्शदीपने २ चेंडूंवर २ स्टंप तोडले. याचा अर्थ त्याने बीसीसीआयचे लाखो रूपयांचे नुकसान केले आहे. (Latest sports updates)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने ८ गडी बाद २१४ धावा केल्या होत्या.

पंजाबकडून कर्णधार सॅम करनने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. तर हरप्रित सिंग भाटियाने ४१ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ५७ धावांचे योगदान दिले. मात्र शेवटच्या षटकात मुंबईला १३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT