MI vs PBKS Match Result Twitter
Sports

MI vs PBKS Result: सूर्यकुमार-ग्रीनची धुव्वाधार फलंदाजी; पण अर्शदीपने एका षटकातच सामना फिरवला, पंजाबचा थरारक विजय

MI vs PBKS Match Result: शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा धावांनी १३ पराभव केला.

Satish Daud

MI vs PBKS Match Result: आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा ३१ वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघात झाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा धावांनी १३ पराभव केला. पंजाबचा यंदाचा हंगामातील हा चौथा विजय आहे. या विजयासह त्यांनी गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. अर्शदीप हा पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने शेवटच्या षटकात मुंबईला लागोपाठ दोन धक्के देत, सामना पंजाबच्या दिशेने फिरवला.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मुंबईसमोर विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात अत्यंत खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकांत अर्शदीपने इशान किशनला बाद केले. इशान किशन अवघ्या १ धावावर बाद झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने सावध खेळी करत मुंबईच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेट्साठी ७६ धावा जोडल्या.

रोहित शर्मा आज चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, पंजाबचा गोलंदाज लियाम लिविंगस्टनने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला ४४ धावांवर बाद करून पंजाब किंग्जला ब्रेक थ्रू दिला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमार यादवने कॅमरून ग्रीनच्या साथीने पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकवेळ मुंबई हा सामना सहज जिंकेल असं वाटत असताना, नॅथन एलिसने कॅमरून ग्रीनला बाद केलं. ग्रीनने ४३ चेंडूत ६७ धावा कुटल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

ग्रीन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार आणि टीम डेव्हिडने मुंबईला विजयाच्या जवळ नेलं. मात्र, अर्शदीप सिंगने सूर्यकुमार यादवला बाद करत सामना पंजाबच्या दिशेने फिरवला. सूर्यकुमारने २६ चेंडूत ५७ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ३ सणसणीत षटकार लगावले. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडने मुंबईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याला अपयश आलं. शेवटच्या षटकांत मुंबईला १६ धावांची गरज असताना अर्शदीपने सलग दोन चेंडूत दोन विकेट्स घेत पंजाबच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं. पंजाबकडून अर्शदीप हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत केवळ २९ धावा देत ४ गड्यांना बाद केलं.

तत्पुर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात मुंबईसमोर २१५ धावांचा डोंगर उभा केला. पंजाबकडून कर्णधार सॅम करनने वादळी अर्धशतक ठोकलं. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही षटकांत हरप्रीत सिंह भाटियाने जबदरस्त फलंदाजी करत ४१ धावा कुटल्या. मुंबईकडून पीयूष चावला याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.  

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

SCROLL FOR NEXT