Arjun Tendulkar Saam tv
Sports

Arjun Tendulkar : साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीत मोठा बदल; अवघ्या ३ चेंडूत द्रविडला दाखवला पव्हेलियनचा रस्ता

Arjun Tendulkar News : साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकरचं क्रिकेट परफॉर्मन्समध्ये सुधारणा. द्रविडला अवघ्या ३ चेंडूत बाद केलं.

Vishal Gangurde

अर्जुन तेंडुलकरने २०२५-२६ हंगामात दमदार सुरुवात

अर्जुनने समित द्रविडला केवळ ३ चेंडूत बाद केल्याने चर्चेत

अलीकडेच अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सानिया चंदोकसोबत झाला होता

डॉक्टर के. थिम्मप्पा मेमोरियल टूर्नामेंटमध्ये अर्जुनने घेतल्या ३ विकेट

Arjun Tendulkar Wicket Samit Dravid: भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्जुन तेंडुलकरने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला बाद करत कामगिरीत सुधारणा केल्याचं दाखवून दिलं आहे. समित द्रविडला बाद केल्याने अर्जुन तेंडुलकरची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरला आहे. २०२५-२६ साली घरगुती हंगामाच्या सुरुवातीलाच अर्जुनने छाप सोडालयला सुरुवात केली आहे.

डॉक्टर के थिम्ेमप्पा मेमोरियल टूर्नामेंट २०२५ च्या गोवा क्रिकेट असोशिएशन आणि केएससीए सेक्रेटरी XI दरम्यान सामना सुरु आहे. या सामनादरम्यान अर्जुन तेंडुलकरने कमाल गोलंदाजी केली आहे. अर्जुनने २१ षटक टाकत ३ गडी बाद केले आहेत. या डावात अर्जुनने राहुल द्रविडचा विकेट घेतला.

अर्जुनने गोव्याकडून खेळताना २८ वे शतक टाकले. त्यावेळी ज्युनिअर द्रविड सामना करत होता. अर्जुनच्या पहिल्या चेंडूवर समितने चौकार लगावला. त्यानंतर अर्जुनने दुसरा चेंडू डॉट टाकला. त्यानंतर टाकलेल्या तिसऱ्या चेंडूत अर्जुनने समितला बाद केलं. समितने २६ चेंडूत ९ धावा करून बाद झाला. करुण नायर देखील या सामन्यात खेळत आहे. त्याच संघात खेळणारा करुण नायर फक्त ३ धावा करून बाद झाला. अर्जुनच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

अर्जन तेंडुलकरचा काही दिवसांपूर्वी सानिया चंदोकशी साखरपुडा झाला. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवि घई यांची नात आहे. एका खासगी कार्यक्रमात सानिया आणि अर्जुनचा साखरपुडा झाला. सचिन तेंडुलकरने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अर्जुनचा साखरपुडा झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : बापानेच लेकीचं कुंकू पुसलं, लग्नाच्या ३ महिन्यातच जावयाची केली हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ३ संशयितांना जामीन मंजूर

Gadchiroli : १० कोटीचे बक्षीस असलेल्या नक्षलवादीचे आत्मसमर्पण; वरिष्ठ नेता भूपती ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरण

Farah Khan: 'अभिनेत्रीने नकार दिला म्हणून 'या' अभिनेत्याने मला किस केलं...'; फराह खानने केला धक्कादायक खुलासा

दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला, चांदीही महागली; तुमच्या भागात आजचा दर किती?

SCROLL FOR NEXT