Daniel Watt And Arjun Tendulkar Saam TV
Sports

विराटला प्रपोज करणारी महिला खेळाडू अर्जुन तेंडुलकरच्या प्रेमात? सोशल मीडियावर चर्चा

अर्जुनचा एका महिला खेळाडूसोबत फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरीज खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड संघात काही दिवसांतच कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही सध्या इंग्लंडमध्ये आहे. अर्जुनची इंग्लंडच्या संघाविरुद्धच्या मालिकेत निवड झाली नाही. मात्र तरीही तो इंग्लंडमध्ये फिरतो आहे. या दरम्यान, त्याचा एका महिला खेळाडूसोबत फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Arjun Tendulkar Latest Marathi News)

अर्जुन हा इंग्लंडची महिला क्रिकेटपट्टू डॅनिएल वॅट सोबत फिरताना दिसत आहे. एका रेस्टॉरंटमधला हा फोटो आहे. जिथे डॅनियल आणि अर्जुन लंचसाठी गेले होते. डॅनियल वॅटने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टाकला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

फोटो व्हायरल होताच अर्जुन आणि डेलिएलच्या प्रेमाची चर्चा रंगली आहे. व्हायरल झालेल्या फोटोत अर्जुनच्या ताटात अनेक रुचकर पदार्थ दिसत आहेत. या फोटोत वॅट दिसत नाहीय. पण तिच्याच मोबाइल कॅमेऱ्यामधून हा फोटो काढण्यात आल्याची शक्यता आहे. अर्जुन आणि डॅनियल वॅट दोघेही चांगले मित्र आहेत. अर्जुन लंडनमध्ये असताना नेहमीच वॅटला भेटतो. याआधी सुद्धा दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

माहितीनुसार, विराट कोहली डॅनियलच्या आवडत्या क्रिकेटपटूपैकी एक आहे. डॅनियलने याआधी विराट कोहलीला लग्नासाठी सुद्धा प्रपोज केला होता. त्यावेळी ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. डॅनियल वॅट तेंडुलकर कुटुंबाला चांगली ओळखते.

2009-10 साली ती लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा भेटली होती. डॅनियल वॅटची सचिनशी ओळख झाली. त्यावेळी अर्जुन तेंडुलकर अवघ्या 10 वर्षांचा होता. वॅट तेंडुलकर कुटुंबासोबत चांगले संबंध ठेऊन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT