अमरावतीकरांच 'चिअर फॉर इंडिया; ऑलिम्पिक खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा अरुण जोशी
Sports

अमरावतीकरांच 'चिअर फॉर इंडिया; ऑलिम्पिक खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा

ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती - महानगरपालिका, जिल्हा क्रीडा Sport कार्यालय व महाराष्ट्र धनुर्विद्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती Amravati शहरात इर्विन चौक येथे ऑलिम्पिक Olympics रिंगचे लोकार्पण करण्यात आले. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

हे देखील पहा -

या कार्यक्रमात स्वाक्षरी अभियान घेवून स्पर्धकांना यश मिळावे यासाठी मान्यवरांनी आपली स्वाक्षरी नोंदवून स्पर्धकांच्या यशस्वितेकरिता आपली सदिच्छा दिली.या स्पर्धेत मूळचा साताऱ्याचा असलेला पण अमरावती क्रीडा प्रबोधणीत धनुर्विद्या या खेळप्रकाराचे प्रशिक्षण घेणारा प्रवीण जाधव हा धनुर्विद्या संघात देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आकाशात रंगीबेरंगी फुगे उडवून याप्रकारे स्पर्धकांना यश मिळावे व भारत देशाचे नाव मोठे व्हाेवे अशी आशा मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी महापौर चेतन गावंडे,उपमहापौर कुसुम साहु, स्थायी समिती सभापती सचिन रासने, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता तुषार भारतीय,विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले,महाराष्ट्रा धनुर्विद्या असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.प्रशांत देशपांडे,भारतीय तिरंदाजी संघाचे सचिव प्रमोद चांदुरकर उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Shiv Sena Live Update : १९ जुलैला निवडणूक आयोगाकडे कोणता पुरावा होता?; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा आयोगाला थेट सवाल

Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी लॉटरी, कुठे किती घरं अन् सोडत कधी निघणार?

Thigh size: जाड मांड्या असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी?

SCROLL FOR NEXT