Rohit Sharma retirement saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्मा आणि गौतम गंभीरमध्ये All Is Well? लॉर्ड्सच्या बाल्कनीत व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण

Rohit Sharma retirement: रोहित शर्मा निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा BCCI ने फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान, लॉर्ड्स मैदानावरील गौतम गंभीर आणि रोहित शर्मा एकत्र हसत-गप्पा मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मतभेदांच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर आणि क्रिकेटविश्वात चांगलंच उधाण आलं बोतं. काही माध्यमांनी 19 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर होणारा सामना हा रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो असा दावा केला होता. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या सर्व अफवा स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत.

अशातच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अशातच लॉर्ड्स मैदानावरून समोर आलेल्या एका व्हिडिओने या चर्चांना वेगळंच वळण दिलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लॉर्ड्सवरील रोहित-गंभीरचा व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये गौतम गंभीर, रोहित शर्मा, फलंदाजी कोच सितांशू कोटक तसंच सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य एकत्र दिसतायत. सराव सुरू होण्यापूर्वी सर्वजण एकमेकांशी गप्पा मारताना आणि हसत-खेळत वेळ घालवत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

यातील सर्वाधिक चर्चेत आलेला क्षण म्हणजे रोहित शर्मा आणि गौतम गंभीर लॉर्ड्सच्या ऐतिहासिक बाल्कनीत उभं राहून निवांत गप्पा मारताना आणि हसताना दिसले. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चांवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

निवृत्तीच्या चर्चांदरम्यानही रोहित शर्माने शनिवारी लॉर्ड्स मैदानावर प्रॅक्टिस केली. पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी त्याने फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्यासोबतही विशेष सराव केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ निवृत्तीच्या चर्चांमुळेच नाही तर रोहित आणि गंभीर यांच्यात मतभेद असल्याच्या अफवांमुळेही अधिक चर्चेचा विषय ठरलाय.

BCCI ने अफवांवर पूर्णविराम दिला

शुक्रवारी BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्मा लॉर्ड्सवर आपला शेवटचा सामना खेळणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणताही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यांनी सांगितलं की, जोपर्यंत रोहित शर्मा टीम इंडियाच्या योजनांचा भाग आहे तोपर्यंत तो देशासाठी खेळत राहणार आहे.

रोहितचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय

रोहित शर्माचा वैयक्तिक फॉर्म सध्या अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत त्याला अनुक्रमे 11 आणि 26 रन्सचं करता आलेत. तसंच मागील आठ वनडे डावांमध्ये त्याच्या नावावर केवळ एकच अर्धशतक आहे.

BCCI ने निवृत्तीच्या अफवा फेटाळल्यामुळे रोहित शर्मा सध्या तरी टीमच्या योजनांमध्ये कायम असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे युवा ओपनर यशस्वी जयस्वालला नियमित संधी मिळण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leg massage: रात्री झोपण्याआधी १५ मिनिटं मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या ७ आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, आता तृणमूल... राहुल गांधींच्या पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप

EPFO New Rule: ईपीएफओचा नियम बदलला! ₹२५,००० पगार असलेल्यांना किती मिळणार पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई

Heart attack risk: तुम्ही पूर्णपणे फिट आहात असं वाटतंय? पहिल्या हार्ट अटॅकपूर्वी शरीरात लपलेले 'हे' 4 धोके ओळखा

SCROLL FOR NEXT