Ajit Pawar On Team India Saam tv
क्रीडा

Ajit Pawar On Team India: जिंकल्यावर उदो उदो होतो, हरलो तर लोक दगडंही मारतात; टीम इंडियासमोर अजित पवारांची फटकेबाजी

Ajit Pawar Speech For Team India in Vidhan Bhavan: विधान भवनात अजित पवारांनी टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. त्याच्या या टिप्पणीवर सभागृहात एकच हश्या पिकला होता.

Bharat Jadhav

आमचं लोकं खूप वेडे आहेत. जिंकल्यावर खूप उदो उदो करतात. तर हरलो तर दगडही मारायला कमी करत नाहीत, अशी फटकेबाजी अजित पवार यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर केली. आज महाराष्ट्राच्या विधानभवनात टी 20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं.

आमचं लोकं खूप वेडे आहेत. जिंकल्यावर खूप उदो उदो करतात. तर हारलो तर दगडही मारायला कमी करत नाहीत, अशी फटकेबाजी अजित पवार यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसमोर केली. आज महाराष्ट्राच्या विधानभवनात टी 20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आले. महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाला 11 कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात आलं.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार उपस्थित होते.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली असल्याचं अजित पवार म्हणाले. फायनल मॅचमध्ये ३० चेंडू आणि ३० रन हव्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू खेळत होते ते पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आशा सोडली होती. पण काही तरी चमत्कार घडेल, असे मला वाटत होतं आणि चमत्कार घडला. पहिल्या सामन्यापासून टीम इंडिया जिंकत होती. रोहित शर्मा चांगल्या पद्धतीनं खेळत होता. विराट पुढं आला आणि त्याची बॅट तळपली. अक्षर पटेलची बॅट तळपली, शिवम दुबेची बॅट तळपली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानं चांगली गोलंदाजी केली, असं अजित पवार म्हणाले.

कालच्या विजयी रॅलीच्या वेळी मरीन ड्राईव्हला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. एवढी गर्दी आपल्या आयुष्याच्या ३० ते ४० वर्षात पाहिली नाही. आताही सभागृहातील वरच्या माळ्यावर बसलेल्या मंडळींना बोलताना अजित पवार म्हणाले, वरच्यांना सांगायचं आहे, चारही खेळाडू चांगल्या प्रकारे दिसत आहेत. वरती व्यवस्थित बसा खाली पडू, नका असं अजित पवार म्हणाले.

रोहित शर्मा, सूर्य कुमार यादवचे खूप कौतुक. सूर्यकुमारनं ज्याप्रकारे कॅच घेतला. सूर्याचा पाय बाहेर टेकला असता तर आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. सूर्याकुमार तू अप्रतिम झेल घेतला. संपूर्ण भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते, असं म्हणत अजित पवार यांनी सूर्यकुमारची फिरकी घेतली. सूर्यकुमार तू झेल घेतला नसता तर रोहितनं सांगितलंय, तुझ्याकडे बघितलं असतं, पण रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं तर आम्ही पण बघितलं असतं. आमचे लोक फार वेडे आहेत. जिंकल्यावर उदो उदो करतात. हरल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत,असं अजित पवार म्हणाले. आपल्याला खिलाडूपणा पाहायला मिळत नसल्याचं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

Maharashtra News Live Updates: कल्याणमध्ये बहुमजली इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

Ramdas Athwale : महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story

SCROLL FOR NEXT