vidyadhar paradkar twitter
क्रीडा

vidyadhar paradkar Death News: रहाणे, झहीर खानला घडवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड! प्रशिक्षक पराडकर यांचे निधन

Ankush Dhavre

Ajinkya Rahane Childhood Coach Vidyadhar Paradkar Death:

भारतीय संघाला अजिंक्य रहाणे आणि झहीर खानसारखे हिरे देणारे प्रशिक्षक विद्याधर पराडकर यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही कालावधीपासूनच त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने वयाच्या १६ वर्षी विद्याधर पराडकर यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती.

अंजिक्य रहाणेची पोस्ट व्हायरल..

अंजिक्य रहाणेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अंजिक्य रहाणेने त्यांना श्रद्धांजली वाहत लिहिले की,' मला हे सांगताना खूप वाईट वाटतंय की, माझे बालपणीचे प्रशिक्षक विद्या पराडकर यांचा स्वर्गवास झाला आहे. मला एक माणूस आणि एक क्रिकेटपटू म्हणून घडवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.' (Latest sports updates)

इंग्लंडच्या खेळाडूला दिली आहे ट्रेनिंग..

इंग्लंडचा युवा फलंदाज हसीब हमीद २०११ मध्ये भारतात आला होता. त्यावेळी विद्याधर पराडकर आणि हसीब हमीदची भेट झाली होती. ४ वर्षांनंतर तो विद्याधर पराडकर अॅकेडमीत परतला होता. त्याने अंडर १९ स्तरावर इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले होते.

त्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली. अखेर विद्याधर पराडकर यांच्या मार्गदर्शनामुळे त्याला इंग्लंडच्या कसोटी संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

ज्यावेळी तो २०१६ मध्ये भारतात परतला होता. त्यावेळी विद्याधर पराडकर आणि त्यांची पत्नी प्रमिला हे दक्षिण मुंबईतील गिल्बर्ट टँक मैदानालगत असलेल्या पन्नालाल टेरेस बिल्डिंगच्या ग्राऊंड फ्लोअरवर राहायचे.

मात्र २०२० मध्ये झालेल्या तुफान पावसामुळे त्यांचं घर नष्ट झालं होतं. याच कारणास्तव त्यांना आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन राहावं लागलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT