Siraj bowling RCB memes saam tv
Sports

RCB vs GT Meme: ठुकरा के मेरा प्यार...! सिराजच्या तुफान गोलंदाजीनंतर RCB ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Siraj bowling RCB memes : गुरुवारी झालेल्या सामन्यात आरसीबी आणि गुजरात आमनेसामने आले. विशेष म्हणजे, सिराज आपल्या माजी संघाविरुद्ध खेळताना गुजरातच्या बाजूने प्रभावी कामगिरी करताना दिसला.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाला. दरम्यान गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहम्मद सिराज गेले काही सिझन रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या ताफ्यात होता. दरम्यान ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं. त्यावेळी आरसीबीला आरटीएमच्या मदतीने सिराजला जोडण्याची संधी होती. आरसीबीने सिराजला सोडलं आणि गुजरात टायटन्सने सिराजला आपल्या टीममध्ये घेतलं.

अशामध्येच बुधवारच्या सामन्यात आरसीबी विरूद्ध गुजरात आसनेसामने असल्याने सिराज त्यांच्या जुन्या फ्रेंचायझीविरूद्ध खेळला. यावेळी सिराजने गुजरातच्या टीमसाठी खेळंही चांगला केला. यामुळे सोशल मीडियावर मोहम्मद सिराजचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

पॉवर प्लेमध्ये सिराजने काढले दोन विकेट्स

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये मोहम्मद सिराजने तब्बल २ विकेट्स घेतल्या. यामध्ये फिल लास्टला पहिल्याच ओव्हरमध्ये त्याच्या बॉलवर जीवदान मिळालं. यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये युवा ओपनर देवदत्त पडिक्कलला आऊट केलं. सिराज एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पॉवरप्लेमध्येच तिसरी ओव्हरही टाकली. यावेळी त्याने सॉल्टला बोल्ड केलं. त्याने पहिल्या तीन ओव्हरमध्ये १५ रन्स देत दोन विकेट्स घेतले.

सोशल मीडियावर मोहम्मद शमीचे मीम्स व्हायरल

मोहम्मद सिराजच्या कामगिरीनंतर आरसीबीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. मोहम्मद सिराज हा हैदराबाद पोलिसात डीएसपी आहे. यावरून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. आरसीबी मॅनेजमेंट आणि त्यांच्या फलंदाजांना अटक केल्याचा मीम्स यावेळी व्हायरल होतोय. हे मीम्स काय आहेत ते पाहूयात.

लिविंगस्टोनचीही घेतली विकेट

मोहम्मद सिराजनेही आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केलं. त्याने अर्धशतक झळकावलं होतं. १९ व्या ओव्हरमध्ये सिराज गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी त्याने दुसऱ्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सिराजने चार ओव्हर्समध्ये १९ रन्स देत ३ विकेट्स घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

Mobile Tips: तुमचा फोन इतक्या लवकर खराब का होतो? जाणून घ्या कारणे आणि टिप्स

SCROLL FOR NEXT