shubman gill saam tv news
Sports

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये डेंग्यूचा शिरकाव! गिल पाठोपाठ आणखी एका भारतीय स्टारला डेंग्यूची लागण

Shubman Gill: शुभमन गिलनंतर आणखी एका स्टारला डेंग्यूची लागण झाली आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023:

वर्ल्डकपच्या सुरूवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. संघातील सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात खेळता आलं नव्हतं.

आता तो पूर्णपणे फिट झाला असून तो पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. दरम्यान या सामन्यापूर्वी आणखी एका भारतीय स्टारला डेंग्यूची लागण झाली आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नईच्या मैदानावर रंगला होता. या सामन्यात गिल खेळताना दिसून आला नव्हता. या सामन्यानंतर भारतीय संघ पुढील सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला होता. मात्र गिल चेन्नईतच थांबला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. आता तो पूर्णपणे फिट असून अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे.

या भारतीय स्टारला झाली कोरोनाची लागण..

प्रसिद्ध भारतीय समालोचक हर्षा भोगले यांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे त्यांना भारत -पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, भारत- पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मी सामन्याला उपस्थित राहु शकणार नाही. मला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आणि अशक्तपणा आल्याने हा सामना मैदानात जाऊन पाहणं शक्य होणार नाही. मात्र १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी मी समालोचन करण्यासाठी परतेन अशी आशा आहे. (Latest sports updates)

भारत-पाकिस्तान सामना..

भारतीय संघाने सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर १४ ऑक्टोबर रोजी होणारा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यासाठी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला छावणीचं स्वरूप देण्यात आलं आहे. हा सामना पाहण्यासाठी केवळ भारत- पाकिस्तानातूनच नव्हे तर जगभरातून क्रिकेट चाहते येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

SCROLL FOR NEXT