Hardik Pandya And Akash Ambani SaamTV
Sports

Hardik Pandya: 'अरे भाई ये तो होता ही रहता है!', परभवानंतर निराश झालेल्या आकाश अंबानीचे हार्दिकने असे केले सांत्वन- VIDEO

Hardik Pandya And Akash Ambani Viral Video: या सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने असे काही कृत्य केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 GT Vs MI: आयपीएल २०२३ स्पर्धेत मंगळवारी एक रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत मुंबई इंडियन्स संघावर ५५ धावांनी विजय मिळवला आहे.

मुंबईचा हा या हंगामातील चौथा पराभव आहे. तर गुजरात टायटन्स संघाचा हा पाचवा विजय आहे. दरम्यान या सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने असे काही कृत्य केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्स संघाचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी आकाश अंबानी मैदानात हजेरी लावत असतो. आपला संघ जिंकला की मुंबईचा मालक जल्लोष करताना दिसून येतो. तर संघ परभूत झाल्यानंतर निराश देखील होत असतो.

हा सामना झाल्यानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या हा मुकेश अंबानीकडे गेला आणि त्याच्या खांदयावर हात ठेऊन त्याचे सांत्वन करू लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विजयी संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या मुकेश अंबानीचे सांत्वन करतोय. तो खांदयावर हात ठेऊन 'अरे भाई ये तो होता ही रहता है...'असे म्हणताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest sports updates)

शुभमन गिल डेव्हिड मिलरची तुफान फटकेबाजी ..

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्स संघाकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने या सामन्यात ३४ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली.

तर डेव्हिड मिलरने या डावात २२ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर गुजरातने २० षटक अखेर ६ गडी बाद २०७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला ९ गडी बाद १५२ धावा करता आल्या. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ५५ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

Kidney deterioration symptoms: कोणत्याही लक्षणांशिवाय खराब होतेय तुमची किडनी; शरीरातील 'हे' ४ मोठे बदल वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update : विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! सापासोबत स्टंटबाजी करनं महागात पडलं; ३० वर्षीय तरुणाचा कोब्राच्या दंशाने मृत्यू|VIDEO

SCROLL FOR NEXT