Ishan Kishan comeback Team India saam tv
Sports

IND vs NZ: श्रेयस की इशान, तिलक वर्माच्या जागी कोण खेळणार? सूर्याने २ वाक्यात विषय संपवला अन् कारणही सांगितलं

Ishan Kishan comeback Team India: भारतीय क्रिकेट टीमसाठी मोठी बातमी समोर आलीये. विकेटकीपर-फलंदाज इशान किशन तब्बल ७८५ दिवसांनंतर टीम इंडियात कमबॅक करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजपासून भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या सिरीजला सुरुवात होणार आहे. या सिरीजमधील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध वनडे सिरीज गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर टी-२० चं आव्हान आहे.

वर्ल्डकपपूर्वी ही सिरीज टीम इंडियासाठी फार महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान अशातच सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने इशान किशनबाबत एक महत्त्वाचं विधान केलंय.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार इशान किशन

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, "इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे. तो टी-२० वर्ल्डकपच्या टीमचा भाग आहे. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. मला वाटतं की, तिसऱ्या क्रमांकावर इशान टीमसाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे."

२०२३ मध्ये खेळला होता शेवटचा सामना

सूर्यकुमारच्या या विधानानंतर, जवळजवळ २६ महिन्यांनंतर इशान किशनचं टीममध्ये कमबॅक निश्चित मानलं जातंय. इशानने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर इशान न्यूझीलंड टी-२० सिरीज आणि टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये परतलाय.

तिलक वर्मा पहिले तीन सामने खेळणार नाही

ज्यावेळी टीमची घोषणा करण्यात आली होती तेव्हा इशान किशनचं नावाची चर्चा होती. मात्र त्याला टीममध्ये संधी मिळणार की नाही याबाबत शक्यता कमी होती. मात्र तिलक वर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरूद्ध पहिले तीन सामने खेळू शकणार नाहीये. अशा परिस्थितीत इशान किशनला संधी मिळू शकते. इशान तिलकच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

इशान किशन हा एक ओपनर आहे. मात्र अनेकदा इंटरनॅशनल सामन्यांमध्ये तो मिडल ऑर्डरमध्येही फलंदाजी करतो. अशामध्ये फलंदाजीसाठी तिसरा क्रमांक त्याच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. इशानने २०२१ मध्ये टी-२० मध्ये डेब्यू केलं होतं. यावेळी ३२ सामन्यांमध्ये ३२ डावांमध्ये त्याने ६ अर्धशतकं लगावली असून ७९६ रन्स केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Politics: मोठी बातमी! कल्याण-डोंबिवलीत राजकीय उलथापालथ, मनसेच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचा महापौर होणार?

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवली मधील शिवसेनेचे ५३ नगरसेवक कोकण भवन येथे दाखल

Shiv Sena : पुन्हा तारीख पे तारीख; शिवसेना कुणाची? आता या दिवशी होणार सुनावणी

Celebrity Mangalsutra Design: दीपिका ते कियारा; बॉलिवूड अभिनेत्रीच्या 'या' नाजूक मंगळसूत्रांची सध्या सोशल मीडियावर क्रेझ

यावर्षी किती लाख कोटींचे सामंजस्य करार होणार? थेट दावोसहून उदय सामंत EXCLUSIVE

SCROLL FOR NEXT