144 वर्षानंतर कसोटी क्रिकेटला मिळणार विश्वविजेता

 

Twitter/@ICC

Sports

144 वर्षानंतर कसोटी क्रिकेटला मिळणार विश्वविजेता

कसोटी क्रिकेटचा इतिहास खूप मोठा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला विश्वविजेते पद मिळेल असे कोणाला वाटले नसेल. आयसीसीने विश्व अजिंक्यपद कसोटीचा अंतिम विजेता निवडायला 2 वर्षापुर्वी सुरू केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कसोटी क्रिकेटचा (Test Cricket) इतिहास खूप मोठा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला विश्वविजेते पद मिळेल असे कोणाला वाटले नसेल. आयसीसीने (ICC) विश्व अजिंक्यपद कसोटीचा अंतिम (WTC Finals) विजेता निवडायला 2 वर्षापुर्वी सुरूवात केली. भारत आणि न्यूझीलंडने कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम दोघांमध्ये प्रवेश मिळवला. आजपासून उभय संघांमध्ये विजेतेपदाची स्पर्धा सुरू होणार असून येत्या काही दिवसांत जगाला पहिला कसोटी विश्वविजेता मिळणार आहे. साऊथहॅम्पटन येथील एजस बाऊल मैदानावर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात दुपारी 3 वाजता सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा निर्माण होऊ शकतो. ताज्या माहितीनुसार साऊहॅम्प्टनमध्ये रात्रभर पाऊस पडत होता आणि अजूनही पाऊस सुरू आहे. पावसामुळे नाणेफेक उशीरा होऊ शकतो.

144 वर्षांत प्रथमच जगाला प्रथम कसोटी विजेता मिळणार आहे

कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा अंतिम सामना जिंकणार्‍या संघाला केवळ ट्रॉफीच मिळणार नाही तर जगातील प्रथम कसोटी चॅम्पियन होण्याचा मानही मिळणार आहे. चॅम्पियन बनणार्‍या संघाला 12 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 6 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहेत. याखेरीज जेतेपद जिंकणार्‍या संघाला कसोटी गदादेखील देण्यात येईल आणि अंतिम सामना टाय किंवा ड्रॉ झाला तर विजेते आणि उपविजेतेपदाची बक्षीस रक्कम दोन्ही संघांमध्ये समान विभागली जाईल. आयसीसी कसोटी अंजिक्यपदाचा पहिला सामना 1 ऑगस्ट 2019 रोजी खेळविण्यात आला होता.

भारतीय संघ मजबूत स्थितीत

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ खूप मजबूत आहेत आणि दोन्ही संघात चॅम्पियन खेळाडूंची कमतरता नाही. टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असून भारतीय डावाची सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर सोपवली आहे. टीम इंडिया खूप संतुलित दिसत आहे आणि जर हा संघ आपल्या पूर्ण सामर्थ्याने खेळला तर विजेतेपद जिंकणे कठीण नाही. संघाची फलंदाजी खूप मजबूत दिसते. रोहित आणि गिल यांच्यानंतर पुजारा, कोहली, रहाणे, ऋषभ पंत, जडेजा आणि अश्विन यांचा समावेश आहे. त्याच बरोवर जलद गती गोलंदाजांंमध्ये शमी, बुमराह आणि इशांत या तिघांचा समावेश आहे.

अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हन कॉनवे, टॉम लाथम, रॉस टेलर, हेनरी निकोलस, बीजे वॅटलिंग, ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर, टिम साउथी, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जेम्सन, टॉम ब्लंडेल, अजाज पटेल, विल यंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT