Abhishek Sharma In T20 World Cup 2026 saam tv
Sports

Abhishek Sharma : सिराजची जर्सी घातली, पण धावांचा 'अभिषेक' नाहीच! वर्ल्ड नंबर १ शर्मा पुन्हा शून्यावर आऊट, कारण चक्रावणारं

Abhishek Sharma wears Siraj jersey out for zero : अभिषेक शर्मा नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजची जर्सी घालून फलंदाजीला उतरला. पण नशिबानं साथ दिली नाही. टी २० वर्ल्डकपमध्ये सलग तिसऱ्यांदा अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला.

Nandkumar Joshi

India vs Netherlands : नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात जगातील क्रमांक एकचा फलंदाज अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. सलग तीन सामन्यांत त्याला खातंही उघडता आलं नाही. टी २० वर्ल्डकपमध्ये जगातील क्रमांक एकच्या फलंदाजाला अद्याप एकही धाव करता आली नाही आणि सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम त्यानं आपल्या नावावर केला.

नेदरलँडच्या विरोधात अभिषेक शर्मा खराब फटका मारून बाद झाला. आर्यन दत्तच्या गोलंदाजीवर पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो चुकला आणि त्रिफळा उडाला. विशेष म्हणजे यावेळी अभिषेक मैदानात फलंदाजीला उतरला त्यावेळी त्यानं स्वतःची जर्सी घातली नव्हती. अभिषेकनं मोहम्मद सिराजची जर्सी घातली होती. पण नशिबानं त्याला साथ दिली नाही. धावांचा 'अभिषेक' त्याला घालता आला नाही.

अभिषेक शर्मा हा मोहम्मद सिराजची जर्सी घालून मैदानात फलंदाजीला उतरला. सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर गुडलकसाठी सिराजची जर्सी घालून तो मैदानात आला. पण अभिषेकला पुन्हा खातं उघडता आलं नाही. जर्सी बदलून धावा करता येत नाहीत, तर चांगले फटके मारून धावा करता येतात, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.

अभिषेक शर्मा या टी २० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करू शकला नाही. मैदानात फलंदाजीला आल्यानंतर तो खराब फटके मारून लागलीच तंबूत परततो. या स्पर्धेत आतापर्यंत तो ८ चेंडू खेळला आहे. यूएसएविरुद्ध तो पहिल्याच चेंडूवर बाद झालाय. पाकिस्तानविरुद्ध चार चेंडू खेळला आणि बाद झाला. तर नेदरलँडविरुद्ध तीन चेंडू खेळून तो माघारी परतला. शर्मा गेल्या सात डावांमध्ये पाच वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंताजनक ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT