Gautam Gambhir Coaching Staff Instagram
Sports

BCCI कडून गौतम गंभीरची मागणी मान्य; टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये ३ दिग्गजांचा समावेश

Gautam Gambhir Coaching Staff: टी-२० मालिकेनंतर २ ऑगस्टपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना २ रोजी आणि दुसरा सामना ४ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान गौतम गंभीरने बीसीसीआयकडे केलेली मागणी मान्य झालीय.

Bharat Jadhav

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन कोचिंग स्टाफची निवड केलीय. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मागणीनुसार केकेआर संघासोबत असलेल्या कोचिंग स्टाफमध्ये असलेल्यांना तिघांना बीसीसीआयने गौतम गंभीरच्या मागणीवरुन हे तिघे नवे दिग्गज खेळाडू टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल होणार आहेत.

या कोचिंग स्टाफमध्ये भारताचा अभिषेक नायर, नेदरलँडचा रायन टेन डेस्कोटे आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये. परंतु क्रिकबझच्या वृत्तानुसार हे तिन्ही दिग्गज गौतम गंभीरसह कोचिंग स्टाफमध्ये असतील. तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप भारतीय संघासोबतच राहणार आहेत.

केकेआरमध्ये असलेल्या अभिषेक नायर आणि टेन डेसकोर्ट यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षक संघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. मॉर्नी मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक नायर आणि टी दिलीप २२ जुलै रोजी भारतीय संघासह श्रीलंकेला रवाना होणार आहेत. तर रायन टेन डेस्कोटदेखील कोलंबोमध्ये थेट टीम इंडियामध्ये सामील होईल.

टेन डेस्कोट सध्या लॉस एंजेलिस नाइट रायडर्सच्या कोचिंग स्टाफचा सदस्य आहे. तसेच तो मेजर लीग क्रिकेटमध्ये भाग घेत असतो. तर मॉर्नी मॉर्केलविषयी बीसीसीआय त्याच्याशी चर्चा करत आहे. तो गोलंदाजी प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला लवकरच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाऊ शकतं.

टीम इंडिया ३ सामन्यांच्या T20 मालिकेत प्रथम श्रीलंकेशी भिडणार आहे. या मालिकेची सुरुवात २७ आणि २८ जुलै रोजी होणाऱ्या सलग दोन सामन्यांनी होणार आहे, तर मालिकेतील अंतिम सामना ३० जुलै रोजी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT