मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा Saam Tv
Sports

मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने आज एक महत्वाची मोठी घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने AB de Villiers आज एक महत्वाची मोठी घोषणा केली आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली आहे.

हे देखील पहा-

डिविलियर्सने सांगितले आहे की हा खूप अविश्वसनीय माझा प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने आतापर्यंत खेळलो आहे.

आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. त्यात ज्योत आता तितकी तेजस्वीपण जळत नाहीये. डिविलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर जगभरात विविध ठिकाणची लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसत होता.

आता त्याने या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो अखेरचे आयपीएल २०२१ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसून आला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

Kidney deterioration symptoms: कोणत्याही लक्षणांशिवाय खराब होतेय तुमची किडनी; शरीरातील 'हे' ४ मोठे बदल वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update : विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! सापासोबत स्टंटबाजी करनं महागात पडलं; ३० वर्षीय तरुणाचा कोब्राच्या दंशाने मृत्यू|VIDEO

SCROLL FOR NEXT