Cristiano Ronaldo crying in world cup 2022 Instagram/@cristiano
क्रीडा

FIFA World Cup 2022 Video: रोनाल्डोचं अधूरं स्वप्न; फ्री-किकचा बेताज बादशाह रोनाल्डो ढसाढसा रडला!

Cristiano Ronaldo Crying In World Cup 2022: पाचही विश्वकपात गोल करण्याचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे. पण आपल्या देशाचे आणि त्याचे स्वप्नं तो पूर्ण करु शकला नाही.

साम न्यूज नेटवर्क

आवेश तांदळे, मुंबई

FIFA World Cup Qatar 2022: सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडतांनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 10 डिसेंबरला शनिवारी फिफा विश्वचषकाच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगलच्या संघाचा मोरोक्कोसमोर पराभव झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा धक्का बसला.

खरंतर गेल्या काही महिन्यांपासून या व्यक्तीला (Cristiano Ronaldo) धक्केवर धक्के बसत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला. त्या दुखातून बाहरे निघाल्यानंतर तोच विश्वकप सुरु होण्यापूर्वी 'मँचेस्टर युनायटेड क्लब'ला गुडबाय केला आहे. त्याच्याच दुसऱ्या दिवसी फुटबॉल असोसिएशनने 2 सामन्याची बंदी घातली. या सर्वांकडे दुर्लक्ष करत त्याने आपल्या देशाला पोर्तुगालला कशाप्रकारे विश्वकप जिंकता येईल यावर लक्ष दिले.

पण आता यासर्वात मोठा अडथळा आला. पोर्तुगाल फुटबॉल टीमची मॅनेजमेंट आणि प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी सलग दुसऱ्या सामन्यात (FIFA World Cup) ख्रिस्तियानो रोनाल्डोला बेंचवर बसवले. पूर्वार्धातील पिछाडीनंतर उत्तरार्धात रोनाल्डोला मैदानात पाठवण्यात आले. ५१ व्या मिनिटात मैदानात आलेल्या ३७ वर्षीय खेळाडूची ही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९६ वी कॅप ठरली.

रोनाल्डो फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडू

जगातील प्रत्येक खेळाडू हे विश्वकप बघूनच तयारी करत असतो. हा तर सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो होता ज्याला तुम्ही महत्वाच्या मॅचमध्ये बाहेर बसवलं. रोनाल्डोने फूटबॉलमधील सर्वोत्तम पुरस्कार बॅलोन डीओर पुरस्कार 'पाच वेळा जिंकला त्याला तुम्ही शेवटच्या दोन मॅच बेंचवर बसवलं. पोर्तुगालकडून त्याने 1997 पासून खेळण्यास सुरुवात केली. देशाकडून खेळतांना 196 मॅचमध्ये 118 गोल केले, त्याला अशाप्रकारे बाहेर बसवणं चुकीचं आहे.

लीग फुटबॉलमध्ये त्याच्या नावावर 700 गोलचा रेकॉर्ड आहे. 7 वेळेस कुठल्याही लीगचा विजय होणे असे अनेक रिकोर्ड रोनाल्डोच्या नावावर आहेत. अशा विक्रमामुळेच रोनाल्डोला फूटबॉलचा GOAT (GREATEST OFF ALL TIME) म्हणून ओळखलं जाते. त्याने आपल्या देशाकडून 5 विश्वकप खेळले आहेत. 2006,2010,2014,2018, आणि 2022 या विश्वकपात एकूण 18 मॅचमध्ये 7 गोल केले. पाचही विश्वकपात गोल करण्याचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे. पण आपल्या देशाचे आणि त्याचे स्वप्नं तो पूर्ण करु शकला नाही.

ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोणत्याही ओळखीची गरज नाही. असे कित्येक सामने त्यांने पोर्तुगालला एकहाती जिंकून दिले. रोनाल्डो आताही फ्री-किकचा बेताज बादशाह आहे. सध्या तरी जगात त्याला तोड नाही. त्याचबरोबर जेव्हा तो चेंडूने गोल पोस्टच्या दिशेने धावतो, तेव्हा जगातील सर्वोत्तम गोलरक्षकही रोखू शकत नाही. (Latest Marathi News)

पराभव रोनाल्डोच्या जास्तच जिव्हारी

पराभव जास्तच जिव्हारी लागला तरंच स्पोर्ट्स पर्सन रडतांना आपण बघत असतो. ब्राझीलचा पराभव झाल्यानंतर नेमणार रडताना आपण बघितला आहे. पण रोनाल्डोच्या बाबतीत तर खूपच वाईट झाले. त्यामुळे तो रडला. मोरोक्कोसमोर पराभव झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठा धक्का बसला आहे.

हा पराभव त्याला सहन झाला नाही आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. पराभवानंतर त्याचा रडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रोनाल्डो रडताना दिसत आहे. रोनाल्डोचा रडण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहतेही रडू लागतील. आता यापुढच्या विश्वकपात रोनाल्डो तर आपल्याला खेळताना दिसणार नाही पण तो रडतांनाचा व्हिडीओ चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT