वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; 5 ठार, नववधूचा जागीच मृत्यू Saam TV
क्रीडा

वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; 5 ठार, नववधूचा जागीच मृत्यू

अपघातात जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संतोष जोशी

नांदेड: कीनवट रस्त्यावर सोमठाणा (ता.भोकर) शिवारात सोमवारी (ता .२१) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विवाह झाल्यानंतर आरतणी परतणी करून परत जाताना टेम्पो आणि मॅजीक वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाल्याने पाच जण जागीच ठार तर बारा जखमी झाले असून मृतांमध्ये नववधुचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार, मागील शनिवारी (ता. २१) साखरा (ता.उमरखेड) येथे पूजा पामलवाड हिचा तिच्या राहत्या गावी विवाह झाला.

विवाहानंतर आरती परतणी करुन नववधू आणि नवरदेव नागेश साहेबराव कनेवाड हे रवीवारी (ता. २० ) जरीकोट येथे आले आणि सोमवारी (ता. २१) विदर्भातील साखरा येथे परत जाताना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कीनवट कडुन भरधाव वेगात येणारा टेम्पो आणि मॅजीक समोरासमोर जोराची धडक झाल्याने नववधू पूजा सह अन्य चार जणांचा जागीच मृत्यू झाला इतर मयताची नावे अद्याप समजू शकले नाही.

जखमी मधील सुनीता अविनाश टोकलवार, कुमारी गौरी माधव चोपवाड (वय दिड वर्षं), अविनाश टोकलवार, अभिनंदन मधुकर कसबे (वय १२ वाजेगाव) यांचा समावेश असून इतर चार कीरकोळ जखमी झाले आहेत.असे एकूण बारा जखमी झाल्याची नोंद रूग्णालयातील सुत्रांनी सकाळ शी बोलताना दिली आहे. भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढिल उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT