neeraj chopra neeraj chopra
Sports

Paris Olympics 2024: 30 देश,715 दिवस, 22000 किमी सायकल प्रवास! नीरज चोप्राचा जबरा फॅन पॅरिस ऑलिंपिकला पोहोचला

Neeraj Chopra Fan, Fayis Asraf Ali: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिंपिक स्पर्धेत ८ ऑगस्टला अॅक्शनमध्ये दिसणार आहे. दरम्यान त्याचा फॅन २२००० किमी प्रवास करत पॅरिसमध्ये पोहोचला आहे.

Ankush Dhavre

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत ११७ खेळाडू भारताला पदक जिंकून देण्यासाठी मैदानात दोन हात करताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा देखील अॅक्शनमध्ये दिसणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा नीरज ८ ऑगस्ट रोजी अॅक्शनमध्ये दिसून येणार आहे. त्याला कोट्यावधी भारतीयांचा पाठिंबा असलेच, यासह आणखी एक स्पेशल फॅन तब्बल २२ हजार किमी सायकलवारी करुन नीरजला सपोर्ट करण्यासाठी पॅरिसमध्ये पोहोचला आहे.

केरळच्या कॅलिकतमध्ये राहणाऱ्या सायकलिस्ट फायिस असरफ अलीने (Fayis asraf ali) १५ ऑगस्ट २०२२ रोजी म्हणजेच २ वर्षांपूर्वी आपल्या सायकलवारीला सुरुवात केली होती. तब्बल ३० देश पालटत आणि २ वर्ष सायकल चालवत तो सिटी ऑफ लव्ह पॅरिसमध्ये दाखल झाला आहे. १ ऑगस्ट २०२३ रोजी त्याला माहिती मिळाली होती की, नीरज बुडापेस्टमध्ये आहे, त्यावेळी त्याने नीरजला भेटण्याची विनंती केली होती.

नीरजने फायिसला त्यावेळी एक सल्ला दिला होता, याबाबत सांगताना फायिस म्हणाला की, ' जर तू लंडनला जाणार असशील, तर पॅरिसलाही ये आणि ऑलिंपिक स्पर्धा पाहण्याचा आनंद घे.' त्यावेळी फायिसने आपला प्लान बदलला आणि पॅरिसला जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवासादरम्यान त्याने ३० दशांमधून प्रवास केला. तो पॅरिसमध्ये दाखल झाला असल्याचा फोटो त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

फायिसचा प्रवास हा मुळीच सोपा नसतो. कारण या प्रवासादरम्यान तो सर्व सामग्री सोबत घेन फिरतो. ज्यात कपडे, टेन्ट, स्लिपिंग बॅग आणि सतरंजीचा समावेश असतो. या सर्व सामग्रीचं वजन जवळपास ५० किलोच्या आसपास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT