Paduka Darshan Sohala 2024 Saam Tv
आध्यात्मिक

Paduka Darshan Sohala 2024: आनंदाचे डोही, आनंद तरंग..., श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद

Mumbai, Navi Mumbai Event on 27 March 2024: सकाळ आयोजित 'श्री फॅमिली गाईड'च्या माध्यमातून संत महात्म्यांच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन घेता येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Paduka Darshan Sohala 2024:

मुखी हरी नाम, हाती टाळ, कपाळी गंध, गळ्यात माळ, डोक्यात टोपी, पांढरे शुभ्र कपडे, नऊवारी साडी अन् डोक्यावर तुळशी वृंदावन, असं भक्तिपूर्ण वातावरण वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सद्गुरू पादुका मंदिर परिसरात आज पाहायला मिळालं. सकाळ माध्यम समूहानं श्री गाइड उपक्रमांतर्गत श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाचं आयोजन केलं आहे. यातच आज भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात या सोहळ्याची सुरुवात झाली.

यावेळी 'संकल्प ते सिद्धी सोहळा' आयोजित करण्यात आला होता. सकाळ श्री गाईड प्रोग्रॅम 'श्रीगुरू पादु‌का सोहळा' वाशी येथे आयोजित करण्यात आला आहे.  येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित 'श्रीगुरू पादुका उत्सव' सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली असून १८ संत- महात्म्यांच्या पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

हाती येता टाळ, तोंडी येतं हरिनाम

हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत भाविक भक्ती रंगात रंगले. तर महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन दिसलं. तसेच बाल विठ्ठलाच्या रूपातील बाल वारकऱ्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. आज सकाळी १०:३० वाजल्यापासून पादुका दर्शन सोहळ्यास सुरुवात झाली. राज्यभरातील हजारो भाविक सकाळपासूनच दाखल होण्यास सुरुवात झाली. सद्गुरू पादुका मंदिराचे आकर्षक प्रवेशद्वार, तेथेच विराजमान संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांचे मनमोहक शिल्प सर्व भाविकांना नतमस्तक होण्यास भाग पाडत होते. 

'दिव्यांग भाविकांसाठी व्हील चेअरची व्यवस्था'

या पादुका दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यातील अनेक महिलांनी पदर पसरून मनोभावे मागण ही मागितलं. यावेळी अनेक भाविकांना फोटो, तसेच सेल्फीचा मोह आवरता आला नाही. अनेकांनी आपल्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून पादुका दर्शन कराव ले. दिव्यांग भाविकांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. जे दिव्यांग एकटे आले होते. त्यांच्यासाठी स्वयंसेवक नेमले होते. यामुळे दिव्यांगांना देखील विना अडथळा दर्शन घेता आले. दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वर्णनातीत असा होता. तसेच  ज्येष्ठांसाठी देखील मदातनीसांच्या मदतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला.

भाविकांना बुधवारीही १८ संत-महात्म्यांचे पादुका दर्शन घेता येईल

दरम्यान, 'सकाळ माध्यम समूहा' तर्फे 'श्री फॅमिली गाईड' प्रोग्रॅमच्या माध्यमातून दोन दिवस म्हणजेच मंगळवार आणि बुधवार या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना उद्या म्हणजेच बुधवारीही १८ संत-महात्म्यांचे पादुका दर्शन घेता येईल.

दर्शनासाठी १८ संत-महात्म्यांच्या पादुका

  • या ऐतिहासिक उपक्रमात १८ संत-महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

  • संत ज्ञानेश्वर महाराज (नेवासा)

  • संत मुक्ताबाई (जळगाव)

  • संत नामदेव महाराज (घुमान)

  • संत जनाबाई (गंगाखेड)

  • संत नरहरी सोनार (पंढरपूर)

  • संत सेनामहाराज (पंढरपूर)

  • संत निळोबाराय महाराज (पिंपळनेर)

  • श्री रामदास स्वामी (सज्जनगड)

  • संत वेणाबाई (मिरज)

  • श्रीगुरू महाअवतार बाबाजी (सौजन्य श्री एम)

  • श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)

  • श्री साईबाबा (शिर्डी)

  • प. प. टेंबे स्वामी महाराज (माणगाव)

  • श्री गजानन महाराज (शेगांव)

  • परमसदगुरू श्री गजानन महाराज (शिवपुरी)

  • श्री शंकर महाराज (धनकवडी)

  • श्री गुळवणी महाराज (पुणे)

  • श्री गुरू बालाजी तांबे (कार्ला)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT