Numerology 
आध्यात्मिक

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक बनतात मोठे अधिकारी; अंगी असतात 'हे' गुण

Numerology: अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. हे शास्त्र प्रामुख्याने व्यक्तीच्या मूलांक संख्येवर आधारित आहे. अंकशास्त्रात, ० ते ९ हे मूलांक संख्या मानले जातात.

Bharat Jadhav

अंकशास्त्रात प्रत्येक नंबरचे स्वतःचे विशेष महत्त्व मानले जाते. एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेच्या आधारे निश्चित केली जाते. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २१ तारखेला झाला असेल तर त्याची मूलांक संख्या २+१ असेल म्हणजेच ०३. अंकशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व दिले गेले आहे, कारण त्याच्या आधारे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्यात.

कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मुलांक ०४ असतो. मूलांक ०४ चा अधिपती ग्रह राहू आहे. हा मूलांक चंद्राशी देखील संबंधित असल्याचे दिसून येते. अंकशास्त्राच्या मान्यतेनुसार या मूलांकाचे लोक प्रत्येक कामात खूप पारंगत असतात. ते प्रत्येक काम चांगल्याप्रकारे पूर्ण करतात.

या व्यक्तीच्या स्वभाव कमालीचा असतो. मूलांक ०४ असलेले लोक खूप धैर्यवान आणि कार्यक्षम असतात. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली राहते आणि त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही. हे मुलांक असलेले लोक मेहनती असतात, त्यामुळे त्यांना तशाप्रकारे यश मिळत असतं. हे व्यक्ती त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करतात. अंकशास्त्रात असेही मानले जाते की हे लोक कठोर परिश्रम करून मोठे सरकारी अधिकारी बनत असतात.

तर मूलांक २ आणि मूलांक ३ साठी, धन आणि सौभाग्य प्राप्तीचा दिवस आहे. अंकशास्त्रानुसार आज शनिदेवाच्या कृपेने मूलांक १ असलेल्या लोकांचा दिवस आनंदात जाईल, परंतु आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मूलांक २ असलेल्या लोकांना आर्थिक फायदा होईल. मूलांक ३ असलेल्या लोकांना आज देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! मुंबईतील समुद्रात चार महिन्यात २४ वेळा भरती; उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा, हवामान विभागाचा अलर्ट

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

SCROLL FOR NEXT