Dreams In Brahm Muhurat 
आध्यात्मिक

Morning Dreams: ब्रह्म मुहूर्तामध्ये पाहिलेली 'ही'५ स्वप्ने देतात शुभ संकेत; नशीब चमकतं अन् होतो पैशांचा पाऊस

Dreams In Brahm Muhurat: पहाटे ३ ते ५ या वेळेत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरतात असं शास्त्र म्हटलंय. आज आम्ही तुम्हाला अशा स्वप्नांबद्दल सांगणार आहोत जे ब्रह्म मुहूर्तामध्ये पाहणे खूप शुभ असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्तावर उठणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती नियमितपणे ब्रह्म मुहूर्तावर उठतो त्याच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. स्वप्न शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्ताचा काळ खूप महत्त्वाचा आहे. शास्त्रानुसार पहाटे ३ ते पहाटे ५ च्या दरम्यान पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरतात. आज अशा स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत. जे ब्रह्म मुहूर्तामध्ये पाहणे खूप शुभ असतं.

नदीत डुबकी घेताना पाहिल्यास

स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर पडलेल्या स्वप्नात स्वतःला नदीत डुबकी मारताना पाहिलं. किंवा स्नान करताना पाहिलं तर ते शुभ संकेत आहेत. मग असं स्वप्न पडलं तर काय होतं असा प्रश्न तु्म्हाला पडला असेल, तुम्ही तुमचे अडकलेले किंवा कर्ज दिलेले पैसे परत मिळवू शकता. तसेच जर तुम्ही पूर्वी गुंतवणूक केली असेल, तर त्यावरही तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, असा या स्वप्नामागील अर्थ असतो.

धान्याचा ढीग पहाणं

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी जर तुम्हाला धान्याचा ढीग दिसला किंवा तुम्ही तुमच्या स्वप्नात धान्याच्या ढिगाऱ्यावर चढताना दिसला असाल तर ते शुभ चिन्ह असू शकते. भविष्यात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.

बाळाला हसताना पहाणं

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर स्वप्न पडलं असेल आणि तुम्ही त्यात एखाद्या बाळाला हसताना किंवा मजा करताना दिसले तर तुमचा सुवर्णकाळ सुरू होण्याची शक्यता असते. तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा आहे आणि तुम्हाला संपत्ती देखील मिळू शकते.

दात पडताना पहा

जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर स्वप्न पडलं असेल आणि त्या स्वप्नात तुम्ही स्वत:ला पाहत असाल तर त्याचा काही तरी चांगले संकेत मिळत असतात, जर तुम्ही स्वप्नात स्वत: ला दात तुटलेलं पाहिलं असेल तर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. स्वप्न शास्त्रानुसार दात तुटल्याचे स्वप्न पाहणे खूप शुभ लक्षण मानलं जातं.

पाण्याचे भांडे पहाणं

जर तुम्ही स्वप्नात पाण्याची घागर पाहिली असेल तर ते शुभ संकेत असतात. स्वप्न शास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की भविष्यात तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ आणि मालमत्तेत नफा मिळू शकतो.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अहिल्यानगरमधून कोणाचा विजय? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT