Gangappa Pujari
वाराणसी लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
वाराणसीतून तिसऱ्यांदा मोदी निवडणुक लढवत आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
वाराणसीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या संपत्तीची माहिती शपथपत्रात दिली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत ५१ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
पीएम मोदींकडे ५२ हजार रुपये रोख कॅश स्वरुपात आहेत. तसेच त्यांची स्टेट बँकेत दोन खाती आहेत.
यापैकी एक खाते गुजरातच्या गांधीनगरमध्ये आहे आणि दुसरे खाते वाराणसीच्या शिवाजी नगर शाखेत आहे. गुजरात बँक खात्यात 73 हजार 304 रुपये आणि वाराणसीच्या खात्यात फक्त सात हजार रुपये आहेत.
पीएम मोदींची एसबीआयमध्येच 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची एफडी आहे.
तसेच त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्यांचे एकूण वजन 45 ग्रॅम असून त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे.
पंतप्रधान मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ना घर आहे ना जमीन. या स्थितीत त्यांची एकूण संपत्ती ३ कोटी २ लाख ६ हजार ८८९ रुपये आहे.