Budh Grah Parivartan: Saam Tv
आध्यात्मिक

Budh Grah Parivartan: बारा राशींमधील ५ राशी होतील धनवान; बुध ग्रह आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करताच होईल चमत्कार

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषानुसार, बुध ग्रह मंगळवार, ९ जुलै २०२४ रोजी दुपारी १२.२९ वाजता आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध आहे. तो शनीच्या नक्षत्र पुष्यातून बाहेर पडून आपल्या नक्षत्रात संक्रमण करणार आहे. याचा सर्व राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल. पण १२ राशींपैकी ५ राशींना याचा अधिकचा फायदा होईल.

मेष

आश्लेषा नक्षत्रात बुधाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास होत संवाद कौशल्य सुधारेल. नोकरदार लोकांची दिनचर्या व्यवस्थित होईल. ते ऑफिस आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यास सक्षम होईल.

मिथुन

आश्लेषा नक्षत्रात बुधाचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठीही फायदेशीर ठरेल. जो लोक व्यवसाय करत आहेत, त्याच्यासाठी हे खूप लाभकारी असणार आहे. या संक्रमणाचा व्यापारावर सकारात्मक परिणाम होणार आहे. व्यापारात नफा वाढेल. नाती मधुर होतील. नोकरीत बढती होऊ शकते. प्रवास फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. तर या राशीतील काही जातकांचे आरोग्य उत्तम राहील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण फलदायी असेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता असते. स्वभावात नम्रता वाढेल. पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग उघडू शकतात. राहणीमान आणि जीवनशैलीत लक्षणीय बदल होतील. रखडलेल्या कामात प्रगती होऊ शकते. वेळेचे व्यवस्थापन व्यवसायात नफा मार्जिन वाढवेल.

तूळ

बुध ग्रहाचे संक्रमण या राशीच्या जातकांसाठी अच्छे दिन आणणारा ठरेल. योग्य प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला अंतर्दृष्टी मिळेल. पैसे मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात गुंतवणूक वाढेल, जो लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना योग्य आणि अयोग्य करिअरमधील फरक ओळखता येईल. कौटुंबिक आनंद उत्कृष्ट राहील.

धनु

या राशीच्या लोकांसाठीही बुध ग्रहाचे आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणं फायद्याचे ठरेल. तुमच्या जीवनात धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यातून आर्थिक लाभही होऊ शकतो. व्यावसायिकांना नवीन पण अनुभवी लोक भेटतील, ज्यामुळे व्यवसायात नफा मिळेल. नोकरदारांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT