सरकारनामा

उदयनराजेंचं ठरणार कधी ? 

सकाळ न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भविष्यातील राजकारणाविषयी आज (सोमवार) निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यात आज होणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार की भाजपमध्ये जाणार हे निश्चित होईल.

भाजप प्रवेशाच्या लाटेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या संदर्भात साताऱ्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महाराज भाजप प्रवेशाचा निर्णय एकदाचा घ्याच. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, उदयनराजेंनी अद्याप राजीनामा दिला नसल्याने भाजपमध्ये  जाण्याबाबत ठाम काही सांगता येत नाही. 

निर्णय घ्यायचा असेल तर राजीनामा दिल्यानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. मुळात आता झालेल्या निवडणुकीत मताधिक्‍क्‍य कमी झाले. तसा हा पराभवच आहे. त्यामुळे सर्वांनी आत्मपरिक्षण करावे आणि निर्णय घ्यावा. आताच भाजप प्रवेश करावा असे काही नाही, असे त्यांनी म्हटले होते.

भाजपचे लोक अनेक दिवसांपासून माझ्या प्रवेशासाठी मागे लागले आहेत, असे सांगून उदयनराजे म्हणाले, माझ्याबद्दल विचाराल तर माझ्यावर 302, 307 चे गुन्हे दाखल झाले. खंडणीचाही झाला. हे सर्व होत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा काहीही बोलत नव्हते. त्यांनी पक्षातील कोणाला विचारले देखील नाही. त्यामुळे का राहायचे, कशासाठी राहायचे त्यांच्यासोबत, असा प्रश्‍न करून उदयनराजे म्हणाले, त्यांना आवर घालत नसाल तर उदयनराजेंनी काय समजायचे. त्यामुळे बदल झाला पाहिजे, असे स्पष्ट केले.

Web Title: Satara MP Udyanraje Bhosale takes political decision
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT