Raosaheb Danve
Raosaheb Danve 
सरकारनामा

इतकी डाळ शिल्लक राहणं हा महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा: रावसाहेब दानवे

लक्ष्मण सोळुंके

जालना : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जे प्रवासी मजदूर दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले होते त्यांना ही प्रति व्यक्ती ५ किलो अन्नधान्य आणि एक किलो डाळ देण्यात आली होती. या धान्यवाटपाबाबत रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. Raosaheb Danves allegations on Mahavikas Aghadi government for Distribution of pulses 

केंद्र सरकारने Central Governmnet कोरोनाच्या संकट काळात देशात खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर आणि आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत मे ते जून या महिन्यात लागू केली होती. या दोन्ही योजने अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रति लाभार्थी पाच किलो गहू Wheat किंवा तांदूळ Rice आणि एक किलो दाळ Pulses एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंत देण्यात आली.

रावसाहेब दानवे म्हणाले, "आत्मनिर्भर भारत Atmnirbhr bharat योजने अंतर्गत १,७६६ मेट्रिक टन दाळ आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्याला १,११,३३७ मेट्रिक टन डाळ दिली. अशी एकूम १,१३,०४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्राला दिली होती, परंतु राज्य सरकारच्या State Government निष्काळजीपणामुळे एकूण ६,४४१ मेट्रिक टन इतकी दाळ शिल्लक राहिली. असे असल्याचा खुलासा राज्य सरकारनेच ६ एप्रिल २०२१ रोज़ी केंद्र सरकारला सादर केलेल्या हवालात केला आहेस''

ते पुढे म्हणाले, "केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करत १५ एप्रिल २०२१ दाळ त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्याची परवानगी राज्य सरकारला दिली ही इतकी डाळ शिल्लक राहणं हे राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा दर्शविणारे आहे," असे दानवे म्हणाले.'' 

राज्यातील या सरकारने वितरण न केल्यामुळे गोदामात ही दाळ खराब होत आहे. अश्या तक्रारी समोर येत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. या नुकसानीस महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप ही ग्राहक संरक्षण,अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. Raosaheb Danves allegations on Mahavikas Aghadi government for Distribution of pulses 

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत प्रवासी मजुरांसाठी Labour केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला ३३४० मेट्रिक टन इतकी डाळ दिली होती. परंतु महाराष्ट्र राज्याच्या मागणीनुसार त्यांना १७६६ मेट्रिक टन इतकी दाळ पुरवण्यात आली होती. त्या पैकी राज्य सरकारने  केवळ १२४८ मेट्रिक टन इतकीच दाळीचे वाटप केल्याचा आरोप ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार वर केला.

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा.. संजय राऊतांचा मोठा आरोप; CM शिंदेंवर निशाणा

Sunil Tatkare News | सुनील तटकरे यांना कोर्टाची नोटीस, खर्चात आढळली तफावत

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग

Ghaziabad Fire Update: कुलिंग टॉवर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी

Nashik Robbery : ICICI होम फायनान्सच्या लॉकरवरच डल्ला; ५ कोटींचे दागिने लंपास, CCTV

SCROLL FOR NEXT