Ekanath Khadse - Narendra Modi
Ekanath Khadse - Narendra Modi 
सरकारनामा

मोदींनी महाराष्ट्रावर अन्यायच केला - खडसेंची टिका

कृष्णकांत साळगावकर, साम टीव्ही, सिंधुदुर्ग

जळगाव : तौत्के चक्रीवादळामुळे Tautkae Cyclone गुजरातप्रमाणे Guraj महाराष्ट्रातही Maharashtra मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुजरातमध्ये नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi लगेचच पाहणी दौरा करत एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रात त्यांनी दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. हा महाराष्ट्रावर एकप्रकारे अन्यायच आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते एकनाथ खडसे यांनी मोदींवर टीका केली आहे. NCP Leader Ekanath Khadse Criticism on Narendra Modi over Cyclone Help

एकनाथ खडसे Ekanath Khadse सोमवारी जळगावात Jalgaon आलेले होते. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलत होते. खडसे पुढे म्हणाले, ''ज्याचे नुकसान होते, तो शेवटी देशाचा नागरिक आहे. त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा असते. राज्यातील नागरिकांना मदत करणे ही राज्याची जबाबदारी आहे,''

हे देखिल पहा

''राज्य सरकार सध्या आढावा घेत आहे. त्यानंतर मदत करेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन मदतीची घोषणा करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माझी मोदींना विनंती आहे, त्यांना महाराष्ट्राला जी काही मदत करायची असेल ती लवकर करावी,'' असेही खडसे म्हणाले. NCP Leader Ekanath Khadse Criticism on Narendra Modi over Cyclone Help

केंद्राने आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करावा-

''सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. परंतु, म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना अँफोटेरेसीन बी इंजेक्शनची गरज भासत आहे. या औषधासाठी परदेशातून कच्चा माल मागवावा लागतो. केंद्राकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील रुग्णांसाठी आवश्यक तो औषधांचा पुरवठा झाला पाहिजे,'' अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT