सरकारनामा

कर्जमाफीच्या यादीतून शेतकऱ्यांची नावं वगळल्यानं नाराजीचा सूर...

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून आज शेतकऱ्यांना गिफ्ट मिळालंय. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ही यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ६८ गावातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. येत्या २४ तासांमध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. जिल्हा पातळीवर देखील आता कर्जमाफीचं काम सुरु करण्यात आलंय.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मागच्या सरकारने कर्जमाफी दिली, मात्र याबाबतचे आकडे मागितल्यावर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आम्ही याबाबतच्या याद्या देखील मागितल्या होत्या, मात्र मागील भाजप सरकारकडून कोणत्याही याद्या आम्हाला देण्यात आल्या नाहीत. गेली पाच वर्ष भाजप सत्तेत होतं, गल्लीपासून दिल्लीत भाजपचं सरकार होतं. अशातही भाजप तोंड लपवत फिरत होतं. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. भाजप विरोधात असल्याने आता त्यांच्याकडे आरोप करण्यावाचून काही काम नाही असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत.  

  • १५,३५८ लाभार्थ्यांची यादी जाहीर... 
  • पहिल्या टप्प्यात ६८ गावांचं समावेश... 
  • ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संकलित... 
  • ४५०० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप पूर्ण... 
  • कर्जमाफीसाठी १५ हजार कोटीची पुरवणी मागणी पटलावरती...  
  • २७ फेब्रुवारी आणि २ मार्चला याबाबत होणार चर्चा... 
  • जिल्हापातळीवर कर्जमाफीचं काम सुरु...
  • कर्जमाफीनंतर प्रमाणपत्रांचे वाटप होणार...

दरम्यान, या कालच महाविकास आघाडीच्या कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आता कर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण

Web Title: first list of mahatma phule farmers loan wavier is out amount will be deposited in 24 hour

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT