सरकारनामा

मतदान करण्यासाठी या 11 गोष्टींचे पुरावे आहेत का?

मोहिनी सोनार

मुंबई : यंदा निवडणुकीसाठी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर हे नक्की वाचा. जर तुमच्याकडे मतदान करण्यासाठी ओळखपत्र नसेल तरीसुद्धा तुम्ही मतदान करु शकता, मात्र त्यासाठी आणखी काही गोष्टी आवश्यक आहे.

 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी  मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे. जर ते नसेल तर किंवा खराब झाले आहे, अस्पष्ट आहे, अशा व्यक्तीसाठी 11 प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

ही आहेत 11 कागदपत्रं

भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले शासकीय, निमशासकीय, शासकीय महामंडळामधील कार्यरत कर्मचारी-अधिकारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे, पोस्टाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत दिलेले जॉब कार्ड, हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र, खासदार व आमदार यांना दिलेले शासकीय ओळखपत्र आणि आधार कार्ड ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जातील

निवडणूक काळात यंदा एक्झिट पोल नाही..

विधानसभा निवडणुकीच्या मतदानकाळात कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT