Arvind Kejariwal 
सरकारनामा

केजरीवाल बनणार अनाथांचे नाथ; मुलांची जबाबदारी उचलत ज्येष्ठांनाही देणार आधार

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली  : कोरोना Corona संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. दिल्लीत अनेक मुलांनी आपले माता-पिता गमावले तर काही ज्येष्ठांनी आपली करती सवरती मुले मृत्युमुखी पडण्याचा धक्का अनुभवला. या संसर्गात अनाथ झालेल्या सर्व मुलांच्या शिक्षणाची त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आणि आर्थिक आधार देण्याची जबाबदारी राज्य सरकारने उचलली आहे. हे काम आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये पूर्ण करू, असा विश्वास दिल्लीचे Delhi मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejariwal यांनी व्यक्त केला आहे. Delhi CM Arvind Kejariwal to support Orphans and Senior Citizens

हे देखिल पहा- 

या संसर्गामध्ये ज्यांच्या घरातील कमावती व्यक्ती मरण पावली आहे, अशा कुटुंबांना देखील राज्य सरकार आर्थिक मदत करेल. असेही केजरीवाल यांनी जाहीर केले. ज्या मुलांनी आपले आई-वडील गमावलेत अशांनी स्वतःला अनाथ समजू नये. सरकार आणि मी व्यक्तिशः त्यांच्या मागे उभा आहे. या सर्व मुलांच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा खर्चही सरकार उचलेल असे त्यांनी जाहीर केले. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची मुले गमावली त्यांचा केजरीवाल नावाचा मुलगा अजून जिवंत आहे, असे भावुक उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

धारावीची पुन्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल

संसर्ग शुन्यावर न्यायचाय
राष्ट्रीय राजधानीमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि संसर्गाचा दर हे गेल्या दोन दिवसांत झपाट्याने कमी होत आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच केजरीवाल यांनी लढाई अजून संपलेली नाही, असे सांगितले. नवीन रुग्णसंख्या काहीशी घटली, हे मी जाहीर करतो मात्र त्याचा अर्थ आरोग्य नियमांचे पालन करणे सोडून द्यायचे असा नव्हे. संसर्गाचा दर आपल्याला शून्य टक्क्यावर न्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.Delhi CM Arvind Kejariwal to support Orphans and Senior Citizens

अतिदक्षता विभागातील बेड भरलेलेच
दिल्लीमध्ये संसर्गाचा दर बारा टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. मागील चोवीस तासांत ही रुग्णसंख्या ८ हजार ५०० पर्यंत कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मागच्या दहा दिवसांमध्ये कोरोना रुग्णांसाठीचे तीन हजार बेड रिकामे झालेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अतिदक्षता विभागातील सर्व बेड अजूनही भरलेले असल्याने धोका कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT