Benefits of supari ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

घरात सुख- समृध्दी वाढवण्यासाठी पुजेत वापरल्या जाणाऱ्या सुपारीचा असा वापर करा

सुपारी जितकी पुजेत महत्त्वाची आहे तितकीच ती खायच्या पानातदेखील वापरली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुपारीला हिंदू धर्मात पूजेच्या वेळी महत्त्वाचे स्थान दिले आहे. सुपारीमुळे खायच्या पानाची चव अधिक वाढते. सुपारीसोबत त्याची पानेदेखील पुजेत ठेवली जातात.

हे देखील पहा-

सुपारी ही गणेशाला अधिक प्रिय आहे अशी मान्यता आहे. अनेक धार्मिक कार्यात सुपारीला स्थान दिले गेले आहे. ज्यावेळी आपल्याकडे एखाद्या देवाची विशेष प्रतिमा नसते त्यावेळी सुपारी ठेवून त्याची पुजा केली जाते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर केला जातो. सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहेत, जे केल्याने आपल्या धनात (Money) वाढ होऊ शकते आणि त्यासोबत सुख-समृद्धीही वाढेल.

हे उपाय नक्की करुन पहा-

१. पूजेच्या वेळी सुपारीला अधिक महत्त्व दिले जाते. या सुपारेचे पूजन करताना त्यांना जनेयू, चंदन, अक्षता, फुले आदी अर्पण केले जाते. आपल्या घरात पूजा झाल्यानंतर पूजेत ठेवलेली सुपारी आपण रक्षासूत्रात गुंडाळून ठेवावी. ती सुपारी आपण आपल्या पैश्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावी यांने धन आणि संपत्ती वाढण्यास मदत होते.

२. अनेकदा प्रयत्न करुन देखील आपल्याला आपल्या करिअर, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कामात अपयश येते. अशावेळी आपण घरातून बाहेर पडताना सुपारी सोबत ठेवायला हवी. ही सुपारी घरी परतल्यानंतर आपल्या देवघरातील गणेशाला अर्पण करावी. असे केल्याने आपली कामे निर्विघ्नपणे पार पडतील.

३. लग्नाचा योग जुळत नसेल तर आपण अशावेळी सुपारी रक्षासुत्रात गुंडाळून ठेवा. त्यानंतर त्याची अक्षता, कुमकुम आणि फुलांनी पूजा करावी. त्या सुपारीला गुरुवारी विष्णू मंदिरात (Temple) ठेवावी. असे केल्याने विवाहाचे योग जुळून येतील तसेच, लग्नानंतर ती सुपारी पाण्यात विसर्जित करावी.

४. आपल्याला करिअर (Career) किंवा व्यवसायात यश मिळवायचे असल्यास गायीच्या तुपात कुमकुम मिसळून सुपारीवर स्वस्तिक बनवा. नंतर त्यावर सुपारी रक्षासूत्रात गुंडाळून प्रतिष्ठापना करावी. व त्याची यथायोग्य पूजा करावी असे केल्याने आपल्याला यशप्राप्ती होईल.

५. व्यवसायात प्रगती होत नसल्यास सुपारीचा उपाय हा शनिवारी करावा. शनिवारी रात्री आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करावी व त्याखाली एक रुपयाचे नाणे आणि सुपारी ठेवावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पिंपळाच्या झाडाचे पान घरी आणावे. त्या पानावर एक सुपारी ठेवून ती आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT