Shukra Gochar 
धार्मिक

Shukra Gochar: नव्या वर्षात शुक्र बदलणार आपली चाल; 'या' ३ राशींना होणार मोठा फायदा, रखडलेली कामे होतील पूर्ण

Shukra Gochar: मागील काही दिवसापूर्वी धन,सुख, आणि वैभवाचे दाता शुक्राने गोचर म्हणजेच संक्रमण केलंय. शुक्राला धन, सुख, प्रेम आणि वैभव आदी गोष्टींचा दाता मानलं जातं.

Bharat Jadhav

वैदिक पंचांगानुसार २८ डिसेंबर रोजी शुक्राने कुंभ राशीत संक्रमण केलंय. कुंभ राशीचे स्वामी शनीदेव आहेत. ते कर्माचे फळ देण्यासाठी ओळखलं जातात. शुक्राच्या गोचरमुळे व्यक्तीच्या जीवनातील अनेक घटकात बदल होईल. चला तर कुंभ राशीत शुक्राचं गोचर संक्रमण कोणत्या राशींसाठी लाभदायी ठरेल ते जाणून घेऊ.

शुक्राच्या गोचरने 'या' तीन राशींना होणार मोठा धनलाभ

वृषभ

राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर आर्थिक भरभराट करून देणारं ठरेल. नव्या वर्षात नोकरी करणाऱ्या लोकांना नवी नोकरी मिळण्याची संधी असेल. व्यापारात वृद्धी झाल्याने आर्थिक लाभ होईल. सर्वात मोठी बाब म्हणजे ज्या लोकांच्या जीवनात प्रेम नाही, अशा अविवाहित लोकांच्या जीवनात प्रेमाची एन्ट्री होईल. तर विवाहित जोडप्यांचं प्रेम वाढेल.

तुळ राशी

धनाचा दाता असलेला शुक्र ग्रह हा तूळ राशीचा स्वामी मानला जातो. शुक्र संक्रमणाचा शुभ परिणाम तुळ राशीच्या लोकांवर राहील. जुन्या गुंतवणुकीतून भरपूर लाभ होईल. विद्यार्थ्यांची सर्जनशील कार्याची आवड वाढेल. यामुळे अनेकांना मानसिक शांतता लाभेल. तर ज्या जातकांना लग्न जमण्यात अडचणी येत असतील त्या अडचणी दूर होतील आणि नवी वर्षात त्यांना त्यांचा जीवन साथीदार मिळेल.

मीन राशी

वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांसह मीन राशीच्या जातकांसाठीही शुक्राचं गोचर फायद्याचं ठरणार आहे. कला, आरोग्य, डिझाईन आणि तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लवकरच प्रमोशनची चांगली बातमी मिळू शकते. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांची आर्थिक स्थिती सुधारेल. येत्या काही दिवसांत वृद्धांचे आरोग्य चांगले राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT