धार्मिक

व्हीआईपी दर्शनाच्या नावाखाली साईभक्तांची लूट 

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक देशभरातून येत असतात, अनेकांना बाबांना जवळून पाहायची इच्छा असते, पण त्यासाठीची भली मोठी रांग धडकी भरवते. हीच गोष्ट हेरून एका टोळीनं साईभक्तांना लुटण्याचा प्लान आखला. व्हीआयपी दर्शन सोबत भक्त निवासात राहण्याची सोय करुन देतो सांगत प्रत्येक भक्ताकडून अडीच हजार घेतले जात होते. बरं एवढे पैसे घेऊन ना साईंचं व्हीआयपी दर्शन होत होतं, ना भक्त निवासात राहण्याची सोय. त्यामुळं भाबड्या भक्तांची लूट होत होती.

शिर्डी पोलिस साध्या वेषात फिरत असताना ही बाब लक्षात आली. आणि त्यांनी 12 जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाबड्या भक्तांची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असली तरी साईंच्या शिर्डीत अशा कितीतरी टोळ्या लुटण्यासाठी सावज हेरत असतात. त्यामुळं भक्तांनीच सावध राहून अशा कोणत्याही टोळीच्या भुलथापांना बळी न पडणं जास्त सोयीचं ठरेल. 

WebTitle : MARATHI NEWS MAHARASHTRA POLICE CAUGHT 12 PEOPLE FOR LOOTING DEVOTEES 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांनी केला प्रवाशाचा चाकूने भोसकून खून

Navi Mumbai BJP News | नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कारण काय?

Chitra Wagh Video: Ullu App चं नाव घेत चित्रा वाघ यांचा ठाकरे पिता पुत्रांवर सनसनाटी आरोप!

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' ज्यूसचे करा सेवन, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात

Special Report: अल्टिमेटम संपला तरी Vishal Patil ठाम! सांगलीत पाटलांवर कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT