Mangal Gochar mangal
धार्मिक

Mangal Gochar: तीन दिवसांनंतर मीन राशीत प्रवेश करेल मंगळ ग्रह; या राशींच्या लोक होतील मालमाल

Mangal Gochar: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी मंगळाच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. काहींना त्यांच्या करिअरमध्ये प्रमोशनही मिळू शकते. यावेळी मंगळाच्या मीन राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींचे भाग्य खुलू शकते ते जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mangal Gochar: मंगळ ग्रह २३ एप्रिल २०२४ रोजी मीन राशीत प्रवेश करेल. मंगळ सध्या कुंभ राशीत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचे संक्रमण अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणणार आहे. अनेकांना अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेकांसाठी प्रगतीचे नवीन मार्गही उघडू शकतात. ज्या लोकांचा व्यवसाय त्यांनाही त्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. मंगळ ग्रहाच्या संक्रमणामुळे तीन राशींच्या जातकांना चांगले दिवस येतील.

मेष

ज्योतिष शास्त्रानुसार २३ एप्रिलनंतर मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होऊ शकते. तुमचे कोणतेही काम दीर्घकाळ अडकले असेल तर त्या कामातही तुम्हाला यश मिळू शकते. काही लोकांना धनसंपत्तीची प्राप्ती होणार आहे. ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यांना फायदा होऊ शकतो.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठीही मंगळ ग्रहाचे संक्रमण लाभदायी असणार आहे. यावेळी जर तुम्ही तुमच्या कामात १००% मेहनत दिला असेल तर भविष्यात तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन देखील मिळू शकते, ज्यामुळे तुमचा पगारही वाढेल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या कुंडलीत प्रगतीची शक्यता आहे.

वृश्चिक

दोन दिवसांनंतर वृश्चिक राशीच्या जातकांना चांगले दिवस बघायला मिळतील. मंगळ ग्रहाचे संक्रमण त्यांना लाभीदायी ठरणार आहे. वृश्चिक राशीतील जे पण काम करतील त्यात त्यांना यश मिळेल. अनेकांना त्याच्या प्रगतीचे मार्ग सापडतील. मंगळ ग्रहाच्या संक्रमणाच्या काळात तुम्ही जर जास्त मेहनत घेतली तर तुम्हाला यश मिळेल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोगावलेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांना आत्मसमर्पण, तुरुंगात जावं लागणार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Tourism: मुंबईपासून १४० किमी अंतरावर आहे,सुंदर हिल स्टेशन; लोणावळाही विसराल

Fack Check : सलमान खानचा MIM मध्ये प्रवेश? व्हायरल व्हिडिओने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ

१०८ कोटी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, बारामतीत ईडीने टाकली धाड; घरात काय घबाड सापडलं? VIDEO

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकची घोषणा, लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द; प्रवाशांचे हाल होणार, कसं आहे रेल्वेचे वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT