Janmashtami 2022, Lord Krishna Saam Tv
धार्मिक

Janmashtami 2022 : श्रीकृष्णाला गोविंद हे नाव कसे पडले ? जाणून घ्या त्याचा इतिहास

श्रीकृष्णाला गोविंद हे नाव कसे पडले जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Janmashtami 2022 : श्री कृष्णाविषयी अनेक प्रसिद्ध कथा आहेत ज्या आपण शतकानुशतके आपण ऐकत आलो आहोत. हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये, श्रीकृष्ण हे सर्वात खोडकर परंतु नेहमी ज्ञानामुळे चर्चित राहिले आहे.

श्रीकृष्ण हे महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचे पात्र आहे, ज्यांनी शस्त्र न उचलता युद्ध केले. महाभारताच्या अनेक कथा आहेत ज्यात प्रत्येक व्यक्ती आणि देवाचे स्वतःचे अंदाज आहेत. महाभारतात अर्जुन श्रीकृष्णाला माधव म्हणायचा आणि द्रौपदी नेहमी गोविंदा म्हणायची.

ब्रह्मपुराणापासून महाभारतापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये श्रीकृष्णाच्या या नावाचा उल्लेख आहे. श्री कृष्णाला गोविंद का म्हणतात त्यामागचा इतिहास.

गोविंद या नावामागील खरा अर्थ

गोविंदांचा अर्थाची फोड केली तर 'गो' या शब्दाचे तीन महत्त्वाचे अर्थ समोर येतात. या शब्दामुळे श्रीकृष्णाचे नाव गोविंद पडले. 'विंद' या शब्दाचा अर्थ आनंदी करणारा असा होतो. अशा परिस्थितीत हे दोन शब्द मिळून तीन अर्थ निघतात.

गो या शब्दाचा अर्थ गायींना प्रसन्न करणारा असा -

कृष्ण सुरुवातीपासून गायी चरण्यासाठी घेऊन जात आणि त्यांना गोरक्षक म्हणून हाका मारत असे. श्रीकृष्णाच्या मधुर बासरीच्या स्वरातून निघणारे स्वर ऐकून सर्व गोरक्षक आणि गुरेढोरे आनंदित व्हायचे. यामुळेच त्यांना गोपाल किंवा गोविंद असेही म्हटले जायचे. श्रीकृष्ण गाई (Cow)-वासरांना अपार आनंद देत असत.

गो या शब्दाचा दुसरा अर्थ इंद्रियांना सुख देणारा -

गो या शब्दाचा दुसरा शाब्दिक अर्थ इंद्रियांना सुख देणारा असा आहे. म्हणूनच श्री कृष्णाला गोविंद या नावाने संबोधले जाते कारण पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्णाचा आवाज, बासुरीचा मधुर स्वर आणि त्यांचे ज्ञान ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध होत असत. जो श्रीकृष्णाचा आश्रय घेत असे तो त्याच्या सर्व इंद्रियांसह दिवसाचे २४ तास आनंद घेऊ शकत असे. या सर्व गोष्टी कथांमध्ये सांगितल्या जातात म्हणून कृष्णाला गोविंदा म्हणतात.

गो या शब्दाचा तिसरा अर्थ पृथ्वीला आनंदी करणारा -

गो या शब्दाचा तिसरा अर्थ म्हणजे पृथ्वी आणि नारायणाने आपल्या कूर्म अवतारात मंथरा पर्वताचे रक्षण केले होते. वराहाच्या रूपाने त्यांनी भूमी देवतेला राक्षसांपासून वाचवून पृथ्वीला आनंदी केले होते. म्हणूनच कृष्णाला (Krishna) गोविंदा असेही म्हणतात.

महाभारताची कथा सांगते की जेव्हा द्रौपदीला वस्त्रहरण होत होते तेव्हा तिने श्रीकृष्णाला गोविंद म्हणून हाक मारली होती. त्यावेळी 'गोविंद पुंडरीकाक्ष, रक्षा सरणागतम्' असा श्लोक म्हणण्यात आला. त्यामुळे गोविंद हे नाव प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाच्या गोविंद या नावामागे अनेक कथा आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT