Panchmukhi diya Benefits ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

घरामध्ये पंचमुखी दिवा लावल्यास मिळेल सर्व संकटांपासून मुक्ती

पंचमुखी दिवा घरात कोणी लावायचा ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हिंदू धर्मात देवाच्या कार्याला अधिक महत्त्व दिले जाते. त्याच्या पूजा- अर्चनेपासून ते त्यांच्या अनेक विधीपर्यत त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. हिंदू धर्मात प्रत्येक पूजेत दिवा लावणे अनिवार्य आणि शुभ मानले जाते.

हे देखील पहा -

कोणत्याही शुभ प्रसंगी दिव्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून देवी-देवतांच्या पूजेत दिवा लावला जातो. घरामध्ये दिवा लावल्याने घरातील नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर होते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे दिवे सांगण्यात आले आहेत. त्यापैकी एक पंचमुखी दिवा आहे.

जाणून घ्या, पंचमुखी दिव्याचे उपाय

१. शास्त्रानुसार प्रत्येक मंगळवारी हनुमानाच्या समोर पंचमुखी दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते व आपल्याला त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

२. पंचमुखी दिवा नेहमी गाईच्या शुद्ध तुपातच लावावा. असे केल्याने घरातील अनैतिक ऊर्जा कमी होऊन घरातील वास्तुदोषही दूर होतात.

३. रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करताना घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही दिशेला पंचमुखी दिवा लावावा. असे केल्यास माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि घरात कधीही धन आणि अन्नाची (Food) कमतरता भासत नाही.

४. घरामध्ये रोज पंचमुखी दिवा लावल्याने आपल्यावर असलेले आर्थिक संकट दूर होते. तसेच जर आपल्यावर बराच काळ सुरु असलेल्या खटल्यातून मुक्ती मिळते.

५. तसेच घरात पंचमुखी दिवा लावल्याने पैसा (Money) सतत घरात खेळता राहातो. अनेक आर्थिक व मानसिक संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT