Lord shiva, Monday benefits ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

सोमवारी शंकाराचा व्रत करताना काळजी घ्या, अन्यथा मोठ्या संकटात सापडाल

सोमवार हा शंकराचा दिवस असून त्याची मनोभावे पुजा केली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हिंदू धर्मात भगवान शंकराला महत्त्वाचे स्थान आहे. सोमवार हा शंकराचा दिवस असून त्याची मनोभावे पुजा केली जाते. भगवान शिवची पूजा केल्याने आणि सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.

हे देखील पहा -

हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा विशिष्ट मानला जातो. प्रत्येक वारानुसार प्रत्येक देवी-देवतांचे महत्त्व सांगितले जाते. आठवड्याचा पहिला वार हा भगवान शंकराच्या (Shiv) नावाने ओळखाल जातो. अशाच धार्मिक शास्त्रांमध्ये सोमवारी शंकराची विधीवत पुजा केली जाते. शंकराच्या पूजेसाठी कोणतेही विशेष नियम नसतात परंतु काही गोष्टी करताना आपण त्याचे भान राखणे आवश्यक आहे. आपण प्रत्येकाने शंकराचा उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

भगवान शंकराची पूजा करताना ही चूक करू नका

१. आपल्यापैकी बरेच लोक शंकराचा सोमवारी अभिषेक करतात. अभिषेक करताना दही, मध आणि अर्पण करावयाची वस्तू शंकराच्या पिंडीवर घेऊन त्याचे स्नान करावे किंवा पाण्याने (Water) स्वच्छ करावे.

२. शिवलिंगाचा अभिषेक करण्यापूर्वी त्याला अर्पण केलेले दूध (Milk) तांब्याच्या भांड्यात ठेवू नका. त्यामुळे दुधाला संसर्ग होतो. जे शंकराला अर्पण करण्यास योग्य नसते. दूध नेहमी पितळेच्या, चांदीच्या किंवा स्टीलच्या भांड्यात घेऊन त्याचा अभिषेक करावा.

३. शास्त्रानुसार भगवान शंकराला रोळी किंवा सिंदूराचा तिलक कधीही लावू नका. भोलेनाथाला चंदनाचा सुवास प्रिय असल्यामुळे त्यांना चंदनाचा तिलक लावावा. याशिवाय आपण अभिषेक करताना दुधात पाणी मिसळून त्याने अभिषेक करावा.

४. शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही करू नये. दूध सोडण्याचा मार्ग आहे त्या ठिकाणी थांबून पुन्हा जा. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास भगवान शिव कधीही आपल्यावर नाराज होणार नाही.

५. नारायण नागबली किंवा कालसर्प असणाऱ्या व्यक्तींना शंकराची दर सोमवारी मनोभावे पुजा व अभिषेक केल्यास त्याच्या आयुष्यातील पिडा कमी होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

Beed News: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचे वाजले तीन-तेरा|VIDEO

SCROLL FOR NEXT