Aashadhi Wari
Aashadhi Wari 
बातमी मागची बातमी

आषाढी वारीसाठी परवानगी न दिल्यास मंत्रालयासमोर आंदोलन....(पहा व्हिडिओ)

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पंढरपूर : वारकऱ्यांसाठी प्राणप्रिय असणाऱ्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र सरकारने Maharashtra Government परवानगी द्यावी, अन्यथा मंत्रालयासमोर Mantralay आंदोलन Agitationn करणार असल्याचा इशारा अखिल भाविक वारकरी मंडळाकडून देण्यात आला आहे. Warkaris demand for Ashadhi Wari

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री Chief Minister आणि उपमुख्यमंत्र्यांना ई-मेल E-mail द्वारे निवेदन ही देण्यात आले आहे. दरम्यान,पंढरपूर परिसरामध्ये विधानसभेची Legislative Assembly  पोटनिवडणूक झाली ,राजकीय सभा झाल्या, सरपंच आरक्षण सोडत झाली, निवडणुकीचा निकाल ही झाला. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, त्यामुळे तेंव्हा कोरोना नव्हता आणि नेमका वारीच्या वेळेसच कोरोना असतो असा दुजाभाव शासनाकडून का होतोय असा प्रश्न ही वारकरी भाविक मंडळाकडून विचारण्यात आला आहे. Warkaris demand for Ashadhi Wari

कोरोनाच्या सर्व नियमांच काटेकोर पालन करून शासनाने वर्षानुवर्षे चालतं आलेल्या आषाढी वारीला परवानगी देऊन परंपरा सांभाळायला मदत करावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली आहे.

कोरोनामुळे वर्षभरात अनेक धार्मिक कार्यक्रम आणि जत्रोत्सव रद्द करावे लागले. यामध्ये आषाढी वारीही रद्द करावी लागली. वारकऱ्यांना वर्षभरापासून लाडक्या विठुमाऊलीचं दर्शन झालेलं नाही. वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलीय. मात्र यंदाच्या वारीवरही कोरोनाचं संकट आहेच. वारकऱ्यांना विठुरायाची ओढ स्वस्थ बसू देत नाहीये. या संदर्भात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज दुपारी साधारण 12 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. 

या बैठकीत वारीचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षीतरी विठुरायाचे दर्शन होणार की नाही, याकडे तमाम वारकरी सांप्रदायाचं लक्ष लागून राहिले आहे. Warkaris demand for Ashadhi Wari

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आम्ही कोरोनाच्या नियमांच पालन करु, पण पायी वारी काढू द्यावी, अशी भूमिका पालखी प्रमुखांची आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

Breaking News: अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर अपघातांची मालिका थांबेना! सलग पाचव्या दिवशी भीषण अपघात; ४ जण जखमी

MI vs SRH: टीम इंडियासाठी गुड न्यूज! सूर्यासह संघातील हे स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परतले

SCROLL FOR NEXT