New Year begins with Bhavai Puja at Melghat 
बातमी मागची बातमी

मेळघाटात भवाई पूजा करून नव्या वर्षाला सुरवात

यूएनआय

अमरावती - राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतात वर्षभरच्या पेरणीच्या कामाला लागले आहेत. शेतीमध्ये पेरणी करणे हा शेतकऱ्यांसाठी एक उत्सव असला तरी जबाबदारीचे काम आहे. पेरणी करण्यापूर्वी शेतकरी पूजा अर्चना करून पेरणीला सुरूवात करत असतात.  New Year begins with Bhavai Puja at Melghat

मेळघाटमध्ये तर पावसाळा लागला की आदिवासी बांधवांच्या नववर्षाला सुरवात होते. मेळघाटात होणारी भवाई पूजा म्हणजे नव्या वर्षाला  सुरवात होते, असे  येथील
आदिवासी मानतात. भवाई पूजा ही गावातील खेडा मुठवा येथे बियाण्याचे पूजन होते. बासाच्या काठीचे पूजन करण्यात येते. लहान मुले मोठी माणसे एकत्र येतात.
शेती कामाची मजुरी ठरवली जाते. वर्ष भराचे परिस्थिती कशी असेल ? गाव गाडा कसा चालवावा याबाबत चर्चा केली जाते.

ही देखील पहा - 

घरात गोड शेवळ्या खाल्या जातात. बाश्याच्या पेरातून, एकमेकांना घासून अग्नी निर्माण केला जातो. प्रत्येक घरी यातून हा अग्नी नेऊन  मग चुली पेटवल्या जातात. त्यावर स्वयंपाक करण्यात येतो. लहान मुले मोठ्या माणसांचे पात्र करत भूमकाने दिलेली सर्व पिकांचे बीज पेरणी करत असतात. नव्या पिढीला या निमित्ताने शेतीविषयी माहिती दिली जाते. 

भवाई पूजा,म्हणजेच  निसर्ग पूजा. या पूजेमध्ये  वृक्षा प्रती आदर व्यक्त केला जातो. त्याचे पूजन करण्यात येते. याच निमित्ताने रोप लागवडीचा विचार लोकांमध्ये रुजवयाचा 
म्हणजे लोकांना या दिवसानिमित्य किंवा या दरम्यान आंबा, मोहा, बास, जांभूळ आवळा ही रोपे देण्याचे नियोजन अंगार मुक्त जंगल अभियानातून केले आहे. लोकांनी ही रोपे शेतीच्या धुऱ्यावर लावावी,  त्याची काळजी घ्यावी, पिकाबरोबर ही रोपे वाढवावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

वनरक्षक श्री चंद्रशेखर थोटे यांनी पुढे जात कासाईखेडा गावच्या भवाई पूजेत एक नवा विचार, नवी कृती लोकांच्या मनात रुजवली आहे. मागील काही दिवसापासून वन रक्षक थोटे यांच्या मनात विचार आला की, आपणही आपल्या जंगलातील झाडांच्या बियांचे पूजन गावच्या भवाई पूजेत करावे आणि त्यांनी वन मजुरांच्या साहाय्याने बीज संकलनाची सुरवात केली.

वनरक्षक थोटे यांनी मोहा, जांभूळ, चारोळी, आंबा, कडाई, आजन, कडुनिंब, बोर, आवळा, चिंच अशा महत्वाच्या प्रजाती बिया गोळा करून त्या पूजेत ठेवल्या. गाव पंचायत प्रमुख भूमका, पड्यार गावकरी हे आश्चर्यचकित झाले होते . त्यांनी ह्या बियांचे पूजन केले.  शेतीच्या बियाण्याची पूजा तर आपण करतोच. झाडांच्या बियांचीही पूजा केली पाहिजे. त्यातून नवे जंगल निर्माण होते. ही जंगले आपल्या जगण्याचा आधार आहेत. हा विचार भवाई पूजे निमित्त रुजवला जात आहे. कोहाना, सोसोखेडा, कंजोली,
धारणमहू, मोथाखेडा, अशा विविध गावात नुकताच भवाई पूजा संपन्न झाली आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT