sangali fertilisers.jpg 
बातमी मागची बातमी

सांगलीत अनधिकृत खतांच्या दुकानावरील छाप्यात लाखोंचा साठा जप्त 

साम टीव्ही न्यूज .

सांगली : अनधिकृतपणे खत विक्री Fertilizer करणाऱ्या सांगली Sangali  शहारातील एका दुकानावर छापा टाकत 21 लाख किंमतीचा 84 मेट्रीक टन खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सांगलीच्या कृषी विभागाकडून Department of Agriculture, Sangli ही कारवाई करण्यात आली आहे.  त्याचबरोबर खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके सज्ज करण्यात आली आहेत.   (Millions of stocks were seized in a raid on an unauthorized fertilizer shop in Sangli) 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना  माफक दरात व गुणवत्ता पूर्ण खते-बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खतांचा काळाबाजार आणि भेसळ युक्त खत विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कृषी विभागाकडून जिल्ह्यात 11 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. 

दरम्यान सांगली शहरातील जुना कुपवाड रोडवरील सह्याद्री नगर, गजानन कॉलनी येथील ग्लोबल इम्पोर्टस या ठिकाणी शेतकरी, किरकोळ उत्पादक आणि कृषी सेवा केंद्रांना लसूक्ष्म अन्नद्रव्ये विकण्यात येत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती.  त्यानुसार पथकाने इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी यांच्या कार्यलय व गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात खते आढळून आली.  ज्यामध्ये कॅल्शीयम नायट्रेट, सल्फर, झिंक सल्फेट , माग्नेशीअम सल्फेट, बोरॉन,  तसेच सिलिकॉन गोळी, सिलिकॉन पावडर, हुमिक फ्लेक्स, बेन्टोनेट गोळी असा एकूण तब्बल 84  मे. टन 350  किलो इतका, असा एकूण 20,60,600 किंमतीचा खतांचा साठा सापडला.

याबाबत ग्लोबल इम्पोर्टसचे मालक तोसिफ नसीर मार्फानी यांच्या कडे भरारी पथकाकडून विक्री परवाना व खरेदी पावत्या मागणी केली असता सादर करू शकले नाही. तर सदर खतांची  विक्री ही अनधिकृतपणे करत असल्याचा प्रकार समोर आल्याने संबंधित विनापरवाना खताचे नमुने शासकीय खत तपासणी प्रयोगशाळा येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर या अनधिकृत खत साठा व विक्री प्रकरणी कृषी विभागाकडून संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited By - Anuradha Dhawade 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan Special : बहिण-भावाच्या नात्यात वाढेल गोडवा, रक्षाबंधनला घरीच झटपट बनवा 'ड्रायफ्रूट केक'

Date Night: पहिल्या डेटवर तुमच्या जोडीदाराला 'हे' प्रश्न नक्की विचारा

Astro Tips: संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ कोणती?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी शिवसेना का फोडली? 3 वर्षानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली आतली बात

Ind vs Eng : कॅच सुटला की, मॅच? मोहम्मद सिराजची मोठी चूक अन् इंग्लंडला मिळालं जीवनदान, शुभमन गिल भडकला; Video

SCROLL FOR NEXT