बातमी मागची बातमी

राज्यात कोरोना तिसऱ्या टप्प्यावर? मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी व्हायला वेळ लागणार नाही...

मोहिनी सोनार

कोरोनावर अत्यंत कडक पावलं उचला, नाहीतर मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी होईल अशा इशारा एम्सच्या संचालकांनी दिलाय. कोरोना आता तिसऱ्या टप्प्यात पोहचलाय. त्यातच अनेक कोरोना रुग्ण असे आहेत, की ज्यांना कोरोना कसा झालाय हे माहितच नाहीय. त्यामुळं कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजेच सामुहिक फैलावाचा धोका वाढलाय. हेच पाहता आता सरकारनं कडक पावलं उचलावी. सोशल डिस्टंसिंगसाठी सक्ती गरजेची असल्याचं एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय. दक्षिण मुंबई सध्या कोरोनाचा ह़ॉटस्पॉट ठरतोय, इथूनच कोरोना सर्वाधिक पसरण्याची शक्यता आहे. हेच पाहता अजून कडक बंधनं घालणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलंय.

जगभरात कोरोनाचा कहर कायम आहे. तसे आपल्या ज्या ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येतंय. तरीही या कोरोनाचं थैमान काही थांबायचं नाव घेत नाहीये. भरतातसुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा 4000 च्या वरती गेलाय. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर दिवसेंदिवस कोरोनाचे नवनवीन रुग्ण सापडत आहेत. राज्यातल्या सीमा सील करण्यात आल्यात. जिल्हाबंदी करण्यात आलीय. जागोजागी पोलिसांचा फौजफाटा आहे जेणे करून लोक बाहेर पडू नये. तरी सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चाललाय. त्याला रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्राणेसमोर आहे. 

एकाच दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची वाढ होतेय. तयात मुंबई आघाडीवर आहे. सध्या राज्यात 868 तर करोना रुग्ण आहेत तर 45 जणांचे मृत्यू झालेत. सध्याच्या स्थितीला काही रुग्ण अत्यवस्थ परिस्थितीत आहेत तर काहिंमध्ये सुधारणा दिसतेय. मात्र मृत्यूचे प्रमाण आणि कोरोना रुग्णांची संख्या ही अति वेगाने वाढतेय. त्यामुळे आपण लवकरच तिसऱ्या टप्प्यात पोहचू अशी शक्यता आहे अशी माहिती खुद्द आरोग्य संरक्षण मंत्री प्रदीप आवटे यांनी दिली. 

जर आपण तिसऱ्या टप्प्यावर पोहचलो तर करोना हवेच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो अस तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर असं झालं तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरसुद्धा मोठा परिणाम होईल.  त्यामुळे आता कोरोनाला थांबवणं खूप महत्वाचं आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT