Notice to stop farmer electricity bill  
बातमी मागची बातमी

75 लाख शेतकरी, वीज ग्राहकांना मोठा दिलासा

साम टीव्ही

वीज बिल थकबाकीदारांना महावितरणनं कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली होती. तर काही ठिकाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरु झाली होती. पण विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर सरकारनं कारवाईला स्थगिती दिलीय.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांचं वीज बिल थकलं  महावितरणनंही या काळात रिडिंग घेणं बंद केलं होतं. त्यामुळं वीज बिलांमध्येही गोंधळ झालाय. लॉकडाऊनच्या काळानंतर राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांचं वीज बिल थकलं. त्यांचे वीज कनेक्शन कापायला सुरुवात केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरासरी वीज बिल देणं बंद करण्याच्या सूचना केल्या.

लोकभावना आणि विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचं वीज कनेक्शन कापणार नसल्याची घोषणा केलीय.

सरकारनं वीज कनेक्शन तोडण्यासाठी स्थगिती दिलीय. हा तात्पुरता दिलासा असला तरी सरकारनं यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी सामान्यांमधून होतेय.
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IIT मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरण: साहिलचा क्लासरूममधील शेवटच्या २० मिनिटांचा CCTV फुटेज आला समोर

Thursday Horoscope : पैशांची बरसात अन् घरात आनंद! १२ राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

SCROLL FOR NEXT