Death of a farmer by touch of a live electric wire; One seriously injured 
बातमी मागची बातमी

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू ; एक गंभीर जखमी

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

यवतमाळ - शेतातील झाडावरील फांद्या तोडण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांचा विजेच्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने देवानंद राऊत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची यवतमाळ जिल्ह्यातील घटनासमोर आली आहे . ही घटना महागाव तालुक्यातील कलगावं शिवारात घडली आहे. तर  अजगर खा पठाण हा मजुर गंभीर जखमी झाला आहे. Death of a farmer by touch of a live electric wire; One seriously injured

देवानंद राऊत यांचे महागाव येथे तिरुपती एजन्सीचे दुकान आहे.  तो सध्या महागाव येथे स्थायिक आहे. आईच्या नावे दीड आणि मृतकाच्या नावे दीड असे तिन एकर सामायिक क्षेत्र आहे. 

ही देखील पहा -

पेरणीची तयारी करत असल्याने शेतात ये - जा करण्यासाठी बाभळीचे झाड अडसर ठरत असल्याने त्याच्या फांद्या तोडण्यासाठी  राऊत या शेतकऱ्याने दोन मजूर नेले होते. शेतात जात असतांना पाण्याचा डबकं साचल्याने पाण्यातून मार्ग काढत होते. तेव्हा जिवंत विद्युत तार पाण्यात पडलेला होता. 

पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नात असतांना जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने जागीच प्राण गमावला आहे.  सहकारी मजुरांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. त्यात एक मजूर गंभीर जखमी झाल्याने त्याला सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृतक देवानंद राऊत यांच्या पाश्चात्य पत्नी, आई, वडील आणि दोन मुले आहेत.
 

Edited By - Puja Bonkile 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

OBC Reservation: ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं?

SCROLL FOR NEXT