Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: पश्चिम रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदासाठी सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. मेडिकल प्रोफेशनल पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या नोकरीसाठी अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी संधी आहे. पश्चिम रेल्वे मुंबई येथे मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. मेडिकल प्रोफेशनल पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे बोर्डाने अर्ज मागवण्यात सुरुवात केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

मेडिकल प्रोफेशनल पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीची सर्व माहिती wr.indianrailway.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. तुम्ही या वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवू शकता.

मेडिकल प्रोफेशनल पदासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०२४ आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा ६५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. मुंबई येथे उमेदवारांनी नोकरी करायची आहे. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही ई- मेल पाठवून नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला acmsbet@gmai.com या मेलवर जाऊन तुमचा अर्ज पाठवावा लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.मुलाखतीसाठी तुम्हाला ७ ऑगस्ट रोजी सीएमएस कार्यालय, पश्चिम रेल्वे, डीआरएम बिल्डिंग, तळमजला, मुंबई सेंट्रल, मुंबई येथे उपस्थित राहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejasswi Prakash: मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुंबईत खरेदी केलं अलिशान अपार्टमेंट, किंमत वाचून व्हाल अवाक

अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव

Maharashtra Live News Update: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

SCROLL FOR NEXT