UPSC Recruitment 2024 SAAM TV
naukri-job-news

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळणार १ लाखापर्यंत पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

UPSC Archaeologist Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या संबंधित सविस्तर माहिती वाचा.

Shreya Maskar

केंद्रीय लोकसेवा आयोगने आर्कियोलॉजिस्ट (पुरातत्त्वज्ञ)पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून तुम्ही ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकता. या पदांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी तुम्ही यूपीएससी ची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या. तसेच तुम्ही अधिक माहितीसाठी या upsconline.nic.in ला वेबसाइट देखील भेट देऊ शकता.

पात्रता काय?

ही पदे उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञांची आहेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण ६७ पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पुरातत्व किंवा मानववंशशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणे अनिर्वाय आहे. तसेच पीजी डिप्लोमा केलेले उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. या क्षेत्रात उमेदवारांना किमान ३ वर्षे काम करण्याचा अनुभव असावा. ३५ ते ४५ वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

फी किती?

यूपीएससीच्या या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २५ रुपये शुल्क भरावे लागेल.

पगार किती?

यूपीएससीच्या या पदांवर उमेदवाराची निवड झाल्यावर, मासिक वेतन ५६,००० रुपये ते १ लाख ७७ हजार रुपये असेल.

निवड प्रक्रिया कशी?

या पदांसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा घेऊन सुरू होईल. ज्याची अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. याच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

अर्ज कसा करावा?

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.

  • येथे होमपेजवर तुम्हाला ऑनलाइन भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • आता एक नवीन पेज उघडेल. या पानावर तुम्हाला पुरातत्वशास्त्रज्ञ नावाच्या लिंकवर क्लिक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: फ्रेशर्स आहात? रेल्वेत काम करण्याची संधी; १९२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा

Bad Cholesterol Symptoms: चाळीशीत गेल्यावर ही तपासणी नक्कीच करा, डोळ्यांत दिसणारी ही चिन्हे देतात गंभीर आजाराचा इशारा

Actress Allegations on Bollywood: 'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप

Kitchen Hacks : लसूण सोलायचा कंटाळा येतोय? मग या 3 भन्नाट ट्रिक्स वापरुनच बघाच

SCROLL FOR NEXT