Union Bank Job Saam Tv
naukri-job-news

Union Bank Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; यूनियन बँकेत निघाली भरती; पात्रता काय?

Union Bank Recruitment 2025: यूनियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. युनियन बँकेत सध्या असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank Of India) असिस्टंट मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

यूनियन बँकेत सरकारी नोकरी (Union Bank Recruitment)करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे ही शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने unionbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करावेत. तुम्हाला वेबसाइटवर डायरेक्ट लिंक मिळणार आहे.

पात्रता

असिस्टंट मॅनेजर क्रेडिट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.CA/CMA(ICWA)/CS उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तसेच एमबीए/ एमएमएस/ PGDM/ PGDBM पदवी प्राप्त केलेली असावी. असिस्टंट मॅनेजर आयटी पदांसाठी अर्ज करणणाऱ्या उमेदवाराने बी.ई./ बीटेक/ एमसीए/ एमएससी (आईटी)/ एमएस/ एमटेक/ 5 वर्षांचा एमटेक कंप्यूटर सायन्स इंजिनियरिंग केलेले असावे.

यूनियन बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ३० वयोगटात असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT